घरमुंबईदुष्काळी मराठवाड्यात बिअर-दारूचे अमाप पीक

दुष्काळी मराठवाड्यात बिअर-दारूचे अमाप पीक

Subscribe

पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या मराठवाड्यात मद्यनिर्मितीसाठी सर्वाधीक पाणी वापरले जात असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे.

राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती उद्भवली असताना तीव्र दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे २६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या मराठवाड्यातील एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या तालुक्यांमध्ये मद्यनिर्मितीसाठी सर्वाधीक पाणी वापरले जात असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. औरंगाबाद शहरातील विदेशी मद्य उत्पादन १२ टक्क्यांनी वाढले असून बिअर उत्पादनात १४ टक्क्यांनी वाढला आले. मिळालेल्या आकडेवारीनुसार साधारण १ बिअर बनवण्यासाठी ६ लिटर पाण्याचा वापर केला जातो. एवढं पाणी ३० ते ४० गावांची वर्षभराची तहान भाकवू शकते. मात्र ते पाणी मद्य बनवण्यासाठी वापरले जात आहे.

मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी पाहिल्यास राज्यात सर्वाधीक आत्महत्या याच जिल्ह्यात झाल्याचे समजते. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातून मिळालेला राज्य उत्पादन शुल्काचा आकडा ४ हजार ९१६ कोटी ५८ लाख ६ हजार २२ रुपये एवढा. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशी-विदेशी, बीअर विक्रीतून मिळालेले उत्पन्न हे ६८७ कोटी रुपयांनी वाढला आहे. पाण्याप्रमाणे मद्य प्राशन होत असलेल्या या भागात मध्यमवर्गीय तरुणाई व्यसनाधीनतेकडे वळली आहेत.

- Advertisement -

राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार औरंगाबाद शहरातील काही मोजक्याच कंपन्यांमधील उत्पादन घटल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबाद शहरात पाच विदेशी मद्यनिर्मिती कंपन्या आहेत. तर नांदेड आणि उस्मानाबादमध्येही विदेशी मद्य बनवले जाते. त्यातील उस्मानाबादमधील कंपनीने या वर्षी उत्पादन केलेले नाही. तर नांदेडमधील पायोनियर डिस्टीलरीजमध्ये मद्य उत्पादनात चार टक्क्यांची वाढ दिसून आली. तरीही मराठवाड्यात मद्य उत्पादन आणि विक्रीत मोठी वाढ झाली आहे. जानेवारी २०१८ आणि जानेवारी २०१९ या महिन्यातील उत्पादन शुल्कातील तूट १ कोटी ४५ लाख १६ हजार ५३ रुपये एवढी बाकी होती.

यंदाच्या वर्षातील जानेवारी २०१९ ते मे २०१९ पर्यंत आत्महत्या केलेल्यांची जिल्हानिहाय आकडेवारी –

  • औरंगाबाद – ४९
  • जालना – ४५
  • परभणी – ३०
  • हिंगोली – १९
  • नांदेड – ४२
  • बीड – ७७
  • लातूर – ३५
  • उस्मानाबाद – ५४
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -