घरमुंबईमहत्त्वाच्या कॉलेजमधील जागा वाढणार?

महत्त्वाच्या कॉलेजमधील जागा वाढणार?

Subscribe

अकरावी प्रवेशावर सरकारकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न

दहावीच्या निकाल घसल्याने राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजचा मार्ग खडतर झाला होता. त्यामुळे राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन राज्य सरकारने सीबीएसई व आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना लेखी गुणांवर प्रवेश देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. परंतु याला होत असलेला विरोध लक्षात घेऊन मुंबईतील नामांकित 60 कॉलेजमध्ये पाच ते आठ टक्के जागा वाढवण्याबाबत सरकार विचार करत आहे. याबाबत सोमवारी शिक्षण विभागातील अधिकारी व नवनियुक्त शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

सीबीएसई व आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना लेखी गुणांवर अकरावीला प्रवेश देण्यासंदर्भात राज्य सरकारने केद्र सरकारच्या मानव संसाधन विभागाला पत्र लिहिल्यानंतर सीबीएसई व आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तीव्र विरोध केला. पालकांचा होत असलेला विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने मुंबईतील नामांकित 60 कॉलेजमध्ये जागा वाढवण्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला आहे. यासंदर्भात सोमवारी नवनियुक्त शिक्षण मंत्री आशिष शेलार, शिक्षण विभागातील अधिकारी, नामांकित 60 कॉलेजचे प्राचार्य यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये सायन्स विभागामध्ये पाच टक्के तर आर्ट्स व कॉमर्स विभागामध्ये आठ टक्के जागा वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.

- Advertisement -

परंतु या प्रस्तावाला प्राचार्यांनी विरोध केला. विद्यार्थी संख्या वाढवल्यास त्यांच्यासाठी आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा कॉलेजांमध्ये नसल्याचे प्राचार्यांकडून सांगण्यात आले. परंतु पाच किंवा आठ टक्क्यांनी विद्यार्थ्यांच्या संख्येत फार मोठी वाढ होणार नसल्याचे शिक्षणमंत्र्यांकडून सांगण्यात आले. त्यावर प्राचार्याने या प्रस्तावाबाबत तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली. मात्र याबाबत अद्याप ठोस निर्णय सरकारकडून अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -