घरमुंबईWorld Blood Donor Day : त्यांनी केले तब्बल २४६ वेळा रक्तदान!

World Blood Donor Day : त्यांनी केले तब्बल २४६ वेळा रक्तदान!

Subscribe

'रक्तदान हे श्रेष्ठदान' या उक्तीचा प्रत्यय देणारे संजय बापट यांनी आत्तापर्यंत तब्बल २४६ वेळा रक्तदान केलं आहे. आणि अजूनही ५१ वर्षीय संजय बापट रक्तदान करताना आणि त्यासाठी जागृती करताना तितकेच उत्साही असतात.

मुंबई सारख्या शहरात रक्तदानाच्या वाढलेल्या जनजागृतीमुळे हल्ली लोकं पुढे येऊ लागले आहेत. तरीही मुंबईत रक्ताची वाढती मागणी असल्यामुळे रक्तदानासाठी सतत सज्ज रहा अन् जीव वाचवा हा नियम पाळणारे ५१ वर्षीय संजय बापट यांनी रक्तदानाचे द्विशतक पूर्ण केले आहे. आजपर्यंत त्यांनी तब्बल २४६ वेळा रक्तदान केले असून त्यांची ओळख ‘प्लेटलेट्स डोनर’ म्हणूनही आहे. मुंबईत १७० हून अधिक रक्तदाते नियमित रक्तदान करत असूनही मुंबईतील रक्ताची मागणी अधिक आहे. त्यासाठी दात्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असा संदेशही ‘जागतिक रक्तदान दिना’ निमित्ताने बापट देतात. संदीप बापट बोरिवलीत राहत असून त्यांनी त्यांच्या ५१ वर्षांच्या हयातीत तब्बल २४६ वेळा रक्तदान करून इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.

रक्त बाहेर तयार होऊ शकत नाही…

१९८७ पासून बापट यांनी रक्तदान करायला सुरुवात केली. ते आजही तेवढ्याच उत्साहाने आपल्या इतर रक्तदात्या मित्रांना
भेटून रक्तदानाबाबतची जनजागृती करतात. संजय बापट यांच्या म्हणण्यानुसार ते दर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात रक्तदान करतात. ‘रक्त जीवन देते. रक्त दुसऱ्या ठिकाणी तयार करता येऊ शकत नाही. फक्त शरीरच रक्त निर्माण करू शकते. त्याचवेळी रक्तातील घटक म्हणजे प्लाझ्मा, प्लेटसलेट्स सारखे घटकही तयार होतात. त्याचा ही फायदा होतो. रक्तदानाने एखाद्याला जीवन मिळत असल्यामुळे जास्तीत जास्त रक्तदानासाठी समोर यावं’, असं आवाहन बापट करतात. २००९ सालापासून त्यांनी रक्तातील विशेष घटक म्हणजेच प्लेटसलेट्स दान करण्यास सुरूवात केली. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स दाता’ म्हणून ओळख मिळाली आहे.

आपल्या शरीरात एकूण सहा लीटर रक्त असते. शरीरात रक्त सतत तयार होत असते. जखमी, अपघाती, गरोदर महिला, शस्त्रक्रियांसाठी आणि रक्त विकार रूग्णांना रक्ताची सतत गरज असते. मागणी आणि पुरवठा यात प्रचंड तफावत असल्याने रक्तदानासाठी प्रत्येकाने समोर यावे.

संजय बापट, रक्तदाता

- Advertisement -

सुरक्षित रक्त सर्वांना…

जागतिक रक्तदाता दिना निमित्ताने ऐच्छिक आणि नियमित रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा सत्कार करण्यात यावा अशी सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून सर्व रक्तपेढ्या आणि हॉस्पिटल्सना करण्यात आली आहेत. ‘सुरक्षित रक्त सर्वांना’ ही या वर्षीच्या रक्तदाता दिनाची थीम असून रक्तदानाबाबत एसबीटीसीकडून देण्यात आलेल्या गाईडलाईन्स पाळण्यावर भर देण्यास सांगण्यात आले आहे. तशा आशयाचं परिपत्रक एसबीटीसीकडून काढण्यात आलं आहे.


हेही वाचा – न्हाळ्यात करा जास्तीत जास्त रक्तदान; राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -