घरनवी मुंबईबोईसर येथे कुणबी समाजोन्नती संघाची अभियांत्रिकी परिषद संपन्न

बोईसर येथे कुणबी समाजोन्नती संघाची अभियांत्रिकी परिषद संपन्न

Subscribe

नव्यापिढीने नोकरी,उद्योगविश्वात अद्ययावत कौशल्य अंगीकृत करुन प्रगती करावी- शशिकांत राऊत @ भारत देशाकडे जागतिक क्षमता केंद्र म्हणून पाहिले जात असून ज्ञान व तंत्रज्ञानाच्या स्थित्यंतराने प्रेरित झालेल्या समाजाने क्रांतिकारी बदलाचा आढावा घेत गतिमान बुद्धिमत्तेचा वापर व सामाजिक मूल्ये जपत नवीन पिढीने अंगीकृत कौशल्य विकसित करीत नोकरी व्यवसायामध्ये वेगाने कृतिशील व्हावे, असे मोलाचा सल्ला बहुराष्ट्रीय नामांकित कंपनी आयन एक्सचेंजचे वरिष्ठ उपाध्यक्ष शशिकांत राऊत यांनी दिला.

नवी मुंबई-कुणबी समाजोन्नती संघाची अभियांत्रिकी परिषद (Engineering Council of Kunbi Samoyannatti Sangh) २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी डॉन बॉस्को स्कूल बोईसर येथे पार पडली.अध्यात्मिक संगीतमयी वातावरणात परिषदेचे उद्घाटन संघाचे अध्यक्ष चंद्रकांत घरत यांच्या हस्ते करण्यात आले.कार्याध्यक्ष मनोज घरत यांनी सर्वांचे स्वागत केले.तर अध्यक्ष चंद्रकांत यांनी संक्षिप्त आढावा घेत तांत्रिक क्षेत्रातील कार्यरत असलेल्या देश परदेशातील अभियंत्याचे कौतुक केले.

अभियंता परिषदेच्या दुसर्‍या सत्रात नवपिढीतील अभियंत्यांनी आधुनिक संगणक प्रणाली व आज्ञावली सह वेगवान कार्यपद्धतीवर भर देत संयंत्र डिझायनर राकेश राऊत, परपेटुटी टेक्नो सॉफ्टचे मार्केटिंग मॅनेजर सुमेध घरत, एशियन पेंट्सचे सेल्स मॅनेजर पारस घरत, सेंट जॉन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका पूजा घरत, अमेरिका संलग्नित आय.एस.एस कंपनीचे सहाय्यक संचालिका सोनम पाटील यांनी संगणक , माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स या क्षेत्रा विषयी प्रेरणादायी माहिती सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कॉम्प्युटर इंजिनीअरिंग मध्ये मास्टर्स उच्चशिक्षण घेतलेल्या प्राध्यापिका पूजा घरत व सहाय्यक संचालक पदावर कार्यरत असलेल्या सोनम पाटीलचे खास कौतुक करण्यात आले.

- Advertisement -

समाजातील पहिला अभियंता, कॅप्सुल प्रकल्प तज्ञ अल्ट्रा प्रोजेक्ट्सचे संचालक विजय घरत आणि भारत सरकार कंपनी माझगाव डॉकचे उच्चपदस्थ महा प्रबंधक नीलमकुमार घरत,बहुराष्ट्रीय नामांकित आयन एक्सचेंज कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष व समुपदेशक शशिकांत राऊत,बांधकाम व्यावसायिक दिनेश घरत व औद्योगिक तांत्रिक संस्थेचे माजी प्राचार्य ऋषिकुमार घरत यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील अनुभव, संधी, कौशल्य विकास व भविष्यातील वाटचालीवर नवोदितांना मार्गदर्शन केले.

- Advertisement -

परिषदेच्या तयारीसाठी जगन्नाथ घरत,संदीप घरत व ज्ञाती बांधवांनी संपर्क संदर्भ साधून त्यांना जोडण्याचे कार्य केले.या परिषदेसाठी बिंदिका पॉली,ग्लोरिअस कोटींग, प्रितम इंडस्ट्री आणि आम्ही कुणबीचे लेखक सतीश घरत यांचे अर्थसहाय्य लाभले. सदर सोहळयाचे सूत्रसंचालन प्रा.संजय घरत यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संघाचे सचिव पंढरीनाथ घरत यांनी केले.या आगळ्या वेगळ्या द्योतक उपक्रमाचे कौतुक होत आहे.

कुणबी अभियांत्रिकी परिषदेमध्ये अल्ट्रा प्रोजेक्टचे संचालक विजय घरत, माझगाव डॉकचे महा प्रबंधक नीलमकुमार घरत, बहुराष्ट्रीय नामांकित कंपनी आयन एक्सचेंजचे वरिष्ठ उपाध्यक्ष शशिकांत राऊत, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य ऋषिकुमार घरत व बांधकाम व्यावसायिक दिनेश घरत यांनी सन्मानित करण्यात आले.

परदेशातील बांधवांकडून शुभेच्छा
१९८० च्या दशकातील अभियंता पदवीधर महिला इंजिनियर मनुजता राऊत यांनी व नवोदित महिला अभियंता सायली घरत यांनी आपल्या संदेशाद्वारे अभियांत्रिकी क्षेत्रातील महिलांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.तसेच परदेशस्थ न्यूझीलंडमधून अक्षय घरत,ऑस्ट्रेलियातून अमेय घरत,नेदरलँड हून अमेय राऊत,स्वीडनहून हार्दिक व कांचन चुरी, अमेरिकेतून किर्तेश राऊत व चिन्मय घरत यांनी परिषदेला भरभरुन शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -