ज्ञानेश्वर जाधव :
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन 2023-24 चे सुधारित आणि सन 2024-25 वर्षाचा अर्थसंकल्प नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सादर केला. नव्या जलस्त्रोत्रचा शोध घेत कल्याणकारी योजना, नव्या शैक्षणिक संकल्पानांचा प्रभावी वापर, त्याचप्रमाणे गतवर्षापासून रखडलेल्या नागरी विकास कामाना पूर्ण क्षमतेने पूर्णत्वास नेण्याचा निर्धार करीत यंदाचा 1377.68 कोटीच्या आरंभीच्या शिल्लकेसह 4 हजार 950 कोटी जमा व 4 हजार 947 कोटी 30 लाख खर्चाचे आणि 2.70 कोटी शिलकेचा अर्थसंकल्प आयुक्त राजेश नार्वेकर यांनी समिती सभागृहात सादर करुन प्रशासकीय मान्यता दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजय कुमार म्हसाळ, शहर अंभियता संजय देसाई, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर आदि प्रशासकीय आधिकारी उपस्थित होते.
सन 2023-24 मधील 4 हजार 925 कोटीचा अर्थसंकल्पात यंदा 25 कोटीनी आर्थिक रक्कमेत वाढ झाल्याचे अंदाज पत्रकात समोर आले आहे. पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईची निवासी योग्य उत्तम शहर ही प्रतिमा उंचवण्यासाठी शहर विकासाला गती देणारे विकास प्रकल्प राबविणे त्याचबरोबर उत्पन्नवाढीवर भर देणारा आणि गतीमान प्रशासनासाठी उपाय योजना करणारा जनता विकासाभिमुख सन 2024-25 चा अर्थसंकल्प सभागृहात मांडला. महानगरपालिकेने आगामी वर्षात 3 हजार 572 कोटी 30 लाख उत्पन्न विविध स्त्रोत्रामधून अपेक्षित धरण्यात आले आहे. वस्तू व सेवा करातून 1 हजार 626 कोटी, मालमत्ता करातून 900 कोटी, नगररचना शुल्क 300 कोटी, शासन अनुदान 244 कोटी, पाणीपट्टी व मोरबे प्रकल्पातून 104 कोटी, मुद्राकाशुल्कापोटी शासन अनुदान 90 कोटी, परवाना व जाहिरात शुल्कांतून 15 कोटी चे उत्पन्न, स्थानिक संस्था कर 50 कोटी, मलनिस्सारण 16 कोटी, महापालिका गुतवणुकीतील व्याजातून 100 कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत महसुलापोटी जमा होणार आहे. तर 4 हजार 947 कोटी 30 एकूण खर्चाचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे.
महापालिका आयुक्तांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मागील रखडलेल्या विकास कामांना गती दिली आहे. त्यामध्ये ऐरोली चिंचपाडा व वाशी येथील नवीन बहुउद्देशीय इमारत, ऐरोली नाटयगृह, वाशी बस स्थानकांतून वाणिज्य संकुल, एमआयडीसी क्षेत्रात 15 किलोमीटरचे रस्ते उभारणे, ऐरोली कटाई उन्नत मार्ग, तुर्भे रेल्वे स्थानकांनजीक जोड पुल, जुईनगर कारशेड पुल, नेरुळ येथील सायन्स पार्क, भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढवून शहराचे भविष्याती पाणी नियोजन, सानपाडा सेक्टर 11 येथील 33.31 कोटी खर्चुन सेंट्रल लायब्ररी उभारणे, 540 कोटी खर्चातून घणसोली-ऐरोली जोड खाडी पुल व रस्ता, बेलापुर नेरुळ यादवनगर कुकशेत येथे नव्या वर्षात चार महापालिकेच्या नव्या शाळा उभारणे, शहरातील विद्याुत स्मशनभूमी उभारणे त्याचप्रमाणे आरोग्यविषयक उपक्रमांत एमआरआय मशीन, अत्याधुनिक शस्त्रक्रिया केंद्र उभारणे, ई-हॉस्पिटल, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा आणि मेमोग्राफी सुविधा उभारणे व त्याचप्रमाणे कोपरखैरणे व बेलापुर बस स्थानकांचा वाणिजय वापरांचा विकास संकुल उभारणे अशा कामांना सन 2024-25 मध्ये पूर्णत्वास नेण्यासाठी आयुक्तांनी लक्ष ठेवले आहे. विशेष म्हणजे अग्निशामन दलाला सक्षम करण्यासाठी 68 मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर वाहन व उंच इमारतींना आग लागल्यास प्रतीबंधकासाठी 32 मीटर उंचीचे टर्न टेबल लॅडर आणि अतिधोकादायक अग्निसुरक्षा वाहन त्याचप्रमाणे विदेशी बनावटीचे पाणी वाहक क्षमतेचे वाहन खरेदी करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे यंदा अग्निशामन विभागाला आयुक्तांनी सक्षम करण्याकडे लक्ष दिल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा – Chandigarh Mayor : देशात प्रथमच महापौर निवडणुकीत न्यायालयाचा हस्तक्षेप; ‘आप’चे कुलदीप चंदीगडचे नवे महापौर
पाण्यासाठी जलस्त्रोचा शोध
नवी मुंबईतील सन 2055 पर्यत वाढत्या लोकसंख्येचे आणि जलमुल्याणांचे प्रमाण पाहता दैनंदिन 950 एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. आगामी कालावधी शाश्वत जलस्त्रोत लक्षात घेता पालिकेने तज्ज्ञाची समिती नेमली आहे. नवी मुंबई शहरासाठी भिरा जलविद्याुत प्रकल्पातून विसर्ग केलेले पाणी घेणे, पातळगंगा नदीतील पाणी उचलणे, भिरा धरणातून कुंडलिका नदीचे टेलरेस पाणी मिळवणे यासाठी पालिकेने शासनाकडे पाठपुरावा सुरु केलेला आहे.
14 गावे अंधातरी
नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळलेल्या 14 गावांना पुन्हा नवी मुंबई समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव टाकण्यात आलेला आहे. पंरतु त्यावर अद्यााप निर्णय न झाल्याने 14 गावांच्या विकासासाठी अर्थसंकल्पात नवी तरतुद करण्यात आलेली नाही.
लवकच होणार मेडिकल कॉलेज
पदव्युत्तर वैद्याकीय संस्थेच्या अनुषंगाने महाराष्ट्र आरोग्य सेवा बोर्डाने मेडिकल कॉलेज उभारणीसाठी पालिकेची तपासणी केली आहे. न्यू दिल्ली यांच्या केंद्रीय आरोग्य यंत्रणेकडून तपासणी बाबतची प्रक्रिया सुरु असून 2025 मध्ये पदव्युत्तर वैद्याकीय इन्स्टीटयुट सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे.
हेही वाचा – Politics : वळसे पाटलांच्या मतदारसंघात रोहित पवारांचे ‘नवा दादा’ नावाने बॅनर
प्रथमच कु स्तीचे मैदान
तरणतलाव सुविधा, बॅडमिटंन कोर्ट या क्रिडा सुविधाप्रमाणे सानपाडा सेक्टर चार येथील मैदानात तसेच कोपरखैरणे सेक्टर चार येथील भुखंड क्रमांक 1 वर कुस्ती आखाडा बांधण्याचे नियोजन वित्तीय वर्षात करण्यात आले आहे.
पालिका शाळेत डिजीटल हजेरी
नवी मुंबई महापालिका शाळेतील विद्यााथ्र्यासाठी नवनवीन योजना राबवण्याबरोबरच सीबएसई च्या शाळा पालिकेने सुरु केल्या आहे. पालिका शाळेतील विद्यााथ्र्याची हजेरी संख्या नोंद करण्यासाठी प्रथमच डिजिटल हजेरी प्रणाली पालिका शाळेतून राबवण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यााथ्र्याची गळती रोखून योजनांचा लाभ प्रत्यक्ष पोहचणार आहे.
ऐरोलीत शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा
वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्यांनतर आता ऐरोलीत सेक्टर 10 येथील भुखंड क्रमांक 20 वर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रांझ धातुचा भव्य पुतळा आणि शिवकालीन इतिहासाचे माहिती देणारे प्रद्रर्शन केंद्र उभारण्यासाठी अर्थसंकल्पात केंद्रस्थान देण्यात आले आहे.
नवी मुंबई महापालिकेला स्वच्छता अभियानात 56 कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. त्यामुळे शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याबरोबरच निवासयोग्य उत्तम शहर ही प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी आणि त्याचप्रमाणे सर्व घटकांना समवेत घेऊन शासकीय योजनांचा लाभ त्याचप्रमाणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापरातून प्रगतीसाधत लोकसहभागांवर भर देण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची करवाढ नसलेला आणि कोणत्याही प्रकाराचा फुगवटा नसलेला, पण विकासकांमाना गती देणारा अर्थसंकल्प मांडताना आनंद होत आहे, अशी माहिती नवी मुंबईमहानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.