घरनवी मुंबईएनएमएमटीची ठाणे ते वाशी मार्गावर इलेक्ट्रिक बस सुरू

एनएमएमटीची ठाणे ते वाशी मार्गावर इलेक्ट्रिक बस सुरू

Subscribe

मार्ग क्रमांक ४ च्या प्रवाशांना साध्या दरात वातानुकूलित सेवा

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने ठाणे ते वाशी सेक्टर ७ या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशां साठी वातानुकूलित इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गावर इलेक्ट्रिक सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार ही मागणी पुर्ण झाली असून काल मंगळवार ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ही बससेवा सुरू झाली असून साध्या दरामध्ये या पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक व वातानुकूलित बसचा आनंद प्रवाशांना घेता येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेच्या ताफ्यामध्ये पर्यावरण दाखल झाल्या आहेत. या बसेस कोपरखैरणे वाशी मार्गावर चालविण्यात येत होत्या परंतु ठाणे दिघा ऐरोली परिसरात या बसेस सुरू करण्यात न आल्याने प्रवाशांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. नुकत्याच नव्याने दाखल झालेल्या वातानुकूलित पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक बसेस ठाणे वाशी मार्गावर सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्यानुसार परिवहन व्यवस्थापनाने बस मार्ग क्रमांक ४ ठाणे ते वाशी सेक्टर ७ या मार्गावर इलेक्ट्रिक वातानुकूलित बससेवा सुरू केले आहे.

- Advertisement -

काल मंगळवारपासून ठाणे-वाशी प्रवाशांकरिता पहिली इलेक्ट्रिक धावली आहे. या बसमधून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी परिवहन प्रशासनाचे आभार मानत वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचे स्वागत केले आहे. प्रवाशांना सध्या कोरोनाच्या सावटामुळे लॉक डाऊनच्या कालावधीत रिक्षाचालकांनी वाढवलेल्या शेअर रिक्षाच्या भाड्यामुळे किमान प्रवासाला देखील अधिक पैसे मोजावे लागत होते परंतु या नव्या इलेक्ट्रिक बसचे किमान भाडे सात रुपये असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

ठाणे ते वाशी बस मार्ग क्रमांक चारवर प्राथमिक स्वरूपात ८ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस सोमवार ते शनिवारी चालवण्यात येणार आहेत. वाशी सेक्टर ७ आणि ठाणे येथून दिवसाला ५६ दुहेरी फेऱ्या होणार आहेत. हि जरी वातानुकूलित बस असली तरी याचे भाडे हे साध्या दराने आकारले जाणार आहे, अशी माहिती परिवहनचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी दिली.

- Advertisement -

साध्या दरात एसीचा प्रवास
किमान भाडे-७ रुपये
ठाणे ते विटावा-९ रुपये
मुकूंद ते ऐरोली-९ रुपये
ऐरोली ते वाशी-२३ रुपये
ठाणे ते महापे-१९ रुपये
दिघा ते महापे-१९ रुपये
दिघा ते एमबीपी-१३ रुपये
ठाणे ते वाशी-२५ रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -