घरनवी मुंबईनवी मुंबईकरांची स्वप्नपूर्ती! मेट्रोचे नागरिकांकडून स्वागत

नवी मुंबईकरांची स्वप्नपूर्ती! मेट्रोचे नागरिकांकडून स्वागत

Subscribe

नवी मुंबई-: शहरांचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिडको महामंडळाने नवी मुंबईकरांसाठी मेट्रो सुरु करुन दिवाळी भेट दिली आहे. मागील अनेक वर्षांपासून मेट्रो कधी धावणार?, मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते कधी होणार? या रंगलेल्या चर्चांना अखेर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वापुर्ण निर्णयाने पुर्ण विराम मिळाला. आज शुक्रवार १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता बेलापूर ते पेंधर (Belapur to pendhar  metro) या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचा शुभारंभ बेलापूर मेट्रो स्थानकात करण्यात आला. नवी मुंबईसह पनवेल, उरण आणि इतर परिसरातील नागरिकांनी पहिल्याच दिवशी मेट्रोने प्रवास करुन मेट्रोचे स्वागत (Welcome to Metro) केले.

बेलापूर रेल्वे स्थानकातून पेंधर तर पेंधरहून बेलापूरकडे अशा एकाच वेळी दोन्ही मार्गावरील मेट्रोचा शुभारंभ करण्यात आला.कालपासून मेट्रो सुरु होणार असल्याचे एसएमएस सोशल मिडीयावर झळकल्याने बेलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती.

- Advertisement -

अत्याधुनिक रचनेचे वातानुकूलित डबे, मेट्रो स्थानकांच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन (एन्ट्री) आणि निर्गमनाची (एक्झिट) व्यवस्था आहे. मेट्रो स्थानकांवर पार्किंगसाठी जागा, दिव्यांग प्रवाशांकरिता रॅम्प, पदपथ (फुटपाथ), ऑटो रिक्षांकरिता जागा, अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था, कॉनकोर्स आणि फलाटांवर प्रवासी घोषणा प्रणाली, सीसीटीव्ही, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, कॉनकोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, ही नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.

  1. प्रवाशांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
    बेलापूर रेल्वे स्थानकात मेट्रोने प्रवासासाठी आलेल्या प्रवाशांनी तिकीट काढल्यानंतर त्यांचे सिडकोतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नागरिकांनीही सिडकोचे आभार मानत मेट्रोचे स्वागत केले.
  2. तीन तरुणीं मेट्रोच्या सारथी
    बेलापूर ते पेंधर मेट्रो मोटारमनचा मान हा तरुणींना मिळाला आहे. अंकिता नाईक ही मराठी तरुणी आणि इतर दोन तरुणींनी नवी मुंबई मेट्रोच्या सारथी होण्याचा मान मिळविला आहे.शहरातील पहिली मेट्रो ट्रेन चालविण्याचा एक आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण असल्याची प्रतिक्रिया अंकिता हिने दिली.                                             
  3. सेल्फीसह निसर्ग संपन्नताचे फोटो सेक्शन
    बेलापूर खिंड, पारसिक हिल, उत्सव चौक,खारघर गोल्फ कोर्स तर दुसरीकडे खाडी किनारा, टोकावर दिसणारे नवी मुंबई विमानतळ क्षेत्र आणि बेलापूर ते पेंधर मार्गावरील निसर्गरम्य परिसरातून नागमोडी वळणे घेत पहिली मेट्रो धावली. मेट्रोतील प्रवाशांनी आपल्या मोबाईमध्ये या मेट्रोतून प्रवासात आनंद देनारी निसर्ग संपदा कैद केली.तर अनेकांनी व्हॉटस अ‍ॅप कॉल करुन इतरांना मेट्रोचे दर्शन घडविले.                                                                   
  4.  नागरिकांचा आनंद गगनात मावेना
    मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असणार्‍या नागरिकांनी प्रत्यक्षात मेट्रोतून बेलापूर ते पेंधर असा १० किमीचा प्रवास केला. उशिरा का होईना सुरु झालेल्या मेट्रोचे पनवेल-नवी मुंबईकरांनी आपला आनंद शब्दरुपी व्यक्त केला.तर सिडकोचे आभार मानले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -