Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर उत्तर महाराष्ट्र कोरोनाची कृपा तरीही नापासांमध्ये मुलेच पुढे

कोरोनाची कृपा तरीही नापासांमध्ये मुलेच पुढे

अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणांची मुक्त उधळण, तरीही अनुउत्तीर्ण होणार्‍यांत मुलांचेच प्रमाण अधिक

Related Story

- Advertisement -

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी (दि.16) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या निकालात यंदा सर्वच शाळांचे निकाल शंभर टक्के लागले. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणांची मुक्त उधळण केली तरी अनुउत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये मुलांचेच प्रमाण अधिक आहे.

नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या चार जिल्ह्यांतील दोन लाख 155 विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यातील तब्बल दोन लाख 93 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे यंदा फक्त 62 विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे निकाल 99.96 टक्क्यांवर स्थिरावला. यात नाशिक जिल्ह्याचा निकाल 99.97 टक्के, धुळे 99.98 टक्के, जळगाव 99.94 टक्के आणि नंदुरबार 99.99 टक्के लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचे प्रमाण जवळपास सारखेच आहे. त्यामुळे विभागातील मुली हुशार, ही आजवरची बिरुदावली यंदा खोटी ठरली आहे. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचा निकाल शंभर टक्क्यांच्या जवळपास जाणार आहे. यंदाचा निकाल शंभर टक्के लागल्याने पुरवणी परीक्षा ही नाममात्र ठरणार असून,अनुउत्तीर्ण ठरलेले 62 विद्यार्थ्यांना यात उत्तीर्ण संधी मिळेल. निकालाची टक्केवारी उंचावल्याने अकरावी व डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेवर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -