घरपालघरVasai municipal corporation news: उपायुक्तांना खातेवाटप

Vasai municipal corporation news: उपायुक्तांना खातेवाटप

Subscribe

पण, नव्या फेरबदलात त्यांच्याकडे चार प्रभाग समितीमधील अतिक्रमण नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर विशेष नियोजन प्राधिकरण विभाग त्यांच्याकडे देण्यात आला आहे.

वसईः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उपायुक्तांच्या बदल्या झाल्यानंतर नव्याने आलेल्या उपायुक्तांसह जुन्या उपायुक्तांना आयुक्त अनिलकुमार पवार यांनी खातेवाटप केले आहे. अजित मुठे यांच्यावर पुन्हा एकदा चार प्रभाग समितीच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर नव्याने आलेल्या उपायुक्त दीपक झिंजाड यांच्याकडे पाच प्रभाग समितीच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.उपायुक्त समीर भुमकर यांच्याकडे उपायुक्त परिमंडळ चारची जबाबदारी कायम ठेवत वैद्यकीय आरोग्य, स्थानिक संस्था कर विभाग देण्यात आला आहे. मात्र, त्यांच्याकडून कर आकारणी, कर संकलन आणि पाणीपट्टी कराची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. अतिक्रमण विभागाची जबाबदारी असताना वादग्रस्त ठरलेल्या उपायुक्त अजित मुठे यांच्याकडून हा विभाग काढून घेण्यात आला होता. पण, नव्या फेरबदलात त्यांच्याकडे चार प्रभाग समितीमधील अतिक्रमण नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर विशेष नियोजन प्राधिकरण विभाग त्यांच्याकडे देण्यात आला आहे.

उपायुक्त विशाखा मोटघरे यांच्याकडे परिमंडळ तीनची जबाबदारी कायम ठेवत पर्यावरण व प्रदुषण, पाणथळ व कांदळवन संर्वधन विभाग देण्यात आले आहेत. परिमंडळ पाचचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्याकडून हा पदभार काढून घेण्यात आला असून परिवहन व्यवस्थापक, सार्वजनिक आरोग्य घनकचरा व्यवस्थापन, मालमत्ता व्यवस्थापन, विधी, वाहन विभागाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. परिमंडळ दोनचे उपायुक्त सदानंद पुरव यांच्याकडे ही जबाबदारी कायम ठेवत आस्थापना, सामान्य प्रशासन, अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन, क्रीडा व सांस्कृतिक विभाग कायम ठेवण्यात आले आहेत. नव्याने आलेल्या उपायुक्त अर्चना दिवे यांच्याकडे परिमंडळ पाचच्या जबाबदारीसह भांडार, कामगार कल्याण विभाग देण्यात आले आहेत. नव्याने आलेल्या प्रियंका राजपूत यांच्याकडे उपायुक्त परिमंडळ एकसह वृक्षप्राधिकरण, उद्यान, महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण, माहिती व जनसंपर्क विभाग देण्यात आले आहेत. नव्याने आलेले उपायुक्त गणेश शेटे यांच्याकडे कर आकारणी व कर संकलन, पाणीपट्टी कर, पाणीपुरवठा विभाग, स्मशानभूमी व दफनभूमी विभाग देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -