घरताज्या घडामोडीSalman Khan News : सलमान खानला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या चाहत्यांवर पोलिसांचा...

Salman Khan News : सलमान खानला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या चाहत्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

आज रमजान ईद असून ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक चाहते सलमान खानच्या घराबाहेर जमले होते. वांद्र्यातील सलमान खानच्या घरासमोर चाहत्यांनी गर्दी केली होती.

मुंबई : आज रमजान ईद असून ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक चाहते सलमान खानच्या घराबाहेर जमले होते. वांद्र्यातील सलमान खानच्या घरासमोर चाहत्यांनी गर्दी केली होती. ही गर्दी इतकी होती की, पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Salman Khan News Police Lathi Charge On The Fans Who Stand Outside Of Home In Mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी ईदनिमित्त सलमान खानला शुभेच्छा देण्यासाठी अनेक चाहते सलमान खानच्या वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात असलेल्या घरासमोर गर्दी करतात. यावेळी सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. त्यानुसार, आजही चाहत्यांनी गर्दी केली होती. सलमानची एक झलक पाहण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी आणि त्याचे फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. मात्र ही गर्दी इतकी वाढली की, पोलिसांना थेट लाठीचार्ज करावा लागला.

- Advertisement -

हेही वाचा – Salman Khan : भाईजानची चाहत्यांना ईदी, नव्या चित्रपटाची केली घोषणा

केवळ ईदलाच नाही तर, सलमान खानच्या वाढदिवशीही चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. यावेळी सलमानने गॅलरीत येऊन त्यांना एक झलक दाखवावी अशी त्यांची अपेक्षा असते. सलमान खानची भेट आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली आणि त्याला ईदच्या शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे चाहते मोठ्या प्रमाणावर त्याच्या घराबाहेर थांबले होते. ही गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली की पोलिसांना अखेर सौम्य लाठीचार्ज करुन गर्दी पांगवावी लागली.

- Advertisement -

हेही वाचा – Crime News : वीज बिल अपडेटच्या नावाने गंडा घालणार्‍या आरोपीस अटक; मध्यप्रदेशात वांद्रे पोलिसांची कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -