घरमनोरंजन'दुसरी जया बच्चन', हीनाची कृती पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

‘दुसरी जया बच्चन’, हीनाची कृती पाहून नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

Subscribe

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली हिना खान टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय चेहरा आहे. या मालिकेतील सोज्वळ अक्षरा आणि ‘कसौटी जिंदगी के 2’ मधील कपटी कोमोलिका या भूमिका प्रेक्षकांचा आवडत्या आहेत. शिवाय बिग बॉस 11 मधून हिनाने मोठा चाहतावर्ग कमावला. विविध फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.हिना खान 24 मार्चला रात्री बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत सहभागी होण्यासाठी पोहोचली.दरवर्षीप्रमाणे यंदाही बाबा सिद्दीकी व झिशान सिद्दीकी यांनी मुंबईत ग्रँड इफ्तार पार्टी आयोजित केली होती.पण हिना खान तिच्या एका कृतीमुळे चर्चेत आली असून तिला ट्रोल केलं जात आहे.

हिना खान का ओरडली?
अभिनेत्री हिना खान बाबा सिद्दीकी व झिशान सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत सलवार सूट आणि त्यावर गुलाबी रंगाची ओढणी अशा लूकमध्ये पाहायला मिळाली. यावेळी तिला पापाराझींनी फोटो काढण्यासाठी आवाज दिला. अभिनेत्री हिना खान बाबा सिद्दीकी व झिशान सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत सलवार सूट आणि त्यावर गुलाबी रंगाची ओढणी अशा लूकमध्ये पाहायला मिळाली. यावेळी तिला पापाराझींनी फोटो काढण्यासाठी आवाज दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

- Advertisement -

 हिना खानला पाहून ट्रोलर म्हणाले
हिना खानच्या या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजण तिला “दुसरी जया बच्चन” म्हणत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “ओव्हर अ‍ॅक्टिंगचे १५० रुपये.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “दुसरी जया बच्चन आहे.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “एवढी ओव्हर अ‍ॅक्टिंग करायची गरज नव्हती.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “नवीन जया बच्चन येत आहे.”

- Advertisement -

अभिनेत्री हिना खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, अलीकडेच अभिनेत्री बिग बॉस 17 चा विजेता मुनवर फारुकीसोबत त्याच्या सुपरहिट म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली. हा म्युझिक व्हिडिओ प्रेक्षकांना खूप आवडला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -