घरपालघरअनधिकृत बांधकाम प्रकरणी मृत व्यक्तीविरोधात गुन्हा

अनधिकृत बांधकाम प्रकरणी मृत व्यक्तीविरोधात गुन्हा

Subscribe

बांधकाम केलेले आढळल्याने सदर अनधिकृत बांधकामाचा वापर थांबवावा, असे नोटिसीद्वारे सूचित करण्यात आले होते. शिवाय सदर अनधिकृत बांधकाम अधिकृत असल्याचे पुरावे सात दिवसांच्या आत सादर करण्यास सांगण्यात आलेले होते.

वसईः खातरजमा न करताच अनधिकृत बांधकामधारकांना नोटीसा काढल्या जात असल्याने वसई-विरार महापालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठली आहे. अशाच पद्धतीचा आंधळा कारभार प्रभाग समिती ‘एफमधून समोर आला आहे. महापालिकेने केलेल्या एका तक्रारीनंतर वालीव पोलिसांनीही डोळेझाक करत मृत व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केल्याने पोलीसही टीकेचे धनी झाले आहेत. वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग समिती ‘एफ धानीव/पेल्हार विभागातील मौजे बिलालपाडा सर्व्हे नंबर 46 मधील आर. के. गोल्ड इंडस्ट्रीयल इस्टेटमधील एका इमारतीत झालेल्या वाढीव बांधकाम प्रकरणी इमारत मालक किरीट वोरा यांना प्रभाग समिती ‘एफच्या प्रभारी सहाय्यक आयुक्त रुपाली संखे यांनी 2 मार्च 2022 नोटीस बजावलेली होती. अनधिकृत बांधकाम विभाग यांनी प्रत्यक्ष पाहणी (6 मे 2022) केली असता वाढीव बांधकाम केलेले आढळल्याने सदर अनधिकृत बांधकामाचा वापर थांबवावा, असे नोटिसीद्वारे सूचित करण्यात आले होते. शिवाय सदर अनधिकृत बांधकाम अधिकृत असल्याचे पुरावे सात दिवसांच्या आत सादर करण्यास सांगण्यात आलेले होते.

या पत्राचा हवाला देत किरीट वोरा यांना 30 मार्च 2022 रोजी पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे इमारत मालक किरीट वोरा यांनी सदर मालमत्ता ही 6 एप्रिल 2021 रोजी आर. के. गोल्ड इंडस्ट्रियल इस्टेट प्रिमायसेस को-ऑ. सोसायटी लिमिटेड यांना हस्तांतरित केलेली होती. शिवाय अमेरिका-न्यूजर्सी येथील वास्तव्यादरम्यान किरीट वोरा यांचे निधन 15 सप्टेंबर 2022 रोजी झालेले आहे. तसा त्यांचा मृत्यूदाखला 20 सप्टेंबर 2022 रोजी आलेला आहे. परंतु या सगळ्याची खातरजमा न करताच वसई-विरार महालिकेने किरीट वोरा यांच्याविरोधात नोटिसा बाजावलेल्या आहेत. शिवाय त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिल्याने वालीव पोलिसांनीही 9 मार्च 2023 रोजी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, महापालिकेच्या आंधळ्या व पोलिसांच्या डोळेझाक कारभाराविरोधात किरीट वोरा यांचे कुटुंबिय व निकटवर्तीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात सोसायटीविरोधात गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. परंतु किरीट वोरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. किरीट वोरा यांनी बांधकाम केलेलेच नसताना महापालिकेने त्यांच्याविरोधात गुन्हा कशा आधारे दाखल केला? असा प्रश्न त्यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या अशा पद्धतीच्या ‘वसुली नोटीसा सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत.

०००

- Advertisement -

याबाबतचे तपशील तपासून संबंधित प्रभारी सहाय्यक आयुक्तांकडून माहिती घेतली जाईल.

-संघरत्ना खिल्लारे, उपायुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -