घरपालघरराजपत्रित अधिकार्‍यांचे रोजगार हमी योजनेशी संबंधित कामे न करण्याचे निवेदन

राजपत्रित अधिकार्‍यांचे रोजगार हमी योजनेशी संबंधित कामे न करण्याचे निवेदन

Subscribe

सर्व गटविकास अधिकारी या राजपत्रित अधिकार्‍यांनी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे व निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांना दिले आहे.

पालघर: ११ एप्रिलपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी संबंधित सर्व कामे करण्यास नम्रपणे नकार असल्याबाबतचे निवेदन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(सा) संघरत्ना खिल्लारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्रामपंचायत) चंद्रशेखर जगताप, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबाक) प्रवीण भावसार, सर्व गटविकास अधिकारी या राजपत्रित अधिकार्‍यांनी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे व निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांना दिले आहे.

या निवेदनात मजुरांच्या उपस्थितीबाबत गट विकास अधिकारी हे जबाबदार राहणार नाहीत, याबाबत शासन निर्णय निर्गमित करणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने बाबतीत ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणांची जबाबदारी निश्चित करणे, राज्यस्तरावरून मंजूर करण्यात येत असलेल्या कामांच्या बाबतीत, मंजुरी बाबत व ६०:४० चे प्रमाण राखण्याबाबत गट विकास अधिकारी जबाबदार राहणार नसल्याबाबत शासन निर्णय निर्गमित करणे. असे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने बाबतीत, संघटनेच्या बैठका दरम्यान निवेदना द्वारे व चर्चेदरम्यान उपस्थित करण्यात आलेले इतर महत्वाचे मुद्दे या निवेदनात नमूद करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -