घरपालघरजवळ आहे धरण धामणी,पण प्यायला नाही पाणी

जवळ आहे धरण धामणी,पण प्यायला नाही पाणी

Subscribe

मात्र पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने सांगायला गेले तर "धरण आहे उषाला , कोरड आहे घशाला" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

डहाणू: उन्हाळा सुरू होताच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. पालघर जिल्ह्यातील महत्त्वाची धरणे म्हणजे धामणी , कवडास ही असून यामधील पाणी हे वसई- विरार यासारख्या शहरांना पाणी पुरवठा केला जातो.परंतु याच धरणांना लागून असलेल्या गावांत पाणी टंचाई निर्माण झाली आहे. डहाणू तालुक्यातील दिवशी , दाभाडी , यासारख्या भागात साधारणतः एप्रिल ते मे महिन्यात पाण्याची टंचाई निर्माण होत असते. परंतु पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि डहाणू या दोन तालुक्यांच्या हद्दीवर असलेली गावे म्हणजे धामणी , आंबेघर , कासाबुद्रुक , सोलशेत या गावांना आणि काही विशेष पाड्यांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्याच बरोबर केंद्र सरकार तर्फे चालू असलेली ’हर घर , हर नळ ’ योजनेतर्फे चालू असलेली नळयोजनेचे काम देखील मंदावली असून गावात मोठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या नुकताच उन्हाळा सुरू झाल्याचे जाणवत आहे आणि सुरुवातीलाच धामणी सारख्या ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे . जे की त्याच गावात मोठे धरण आहे. त्या धरणात पाण्याचा साठा आहे. मात्र पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने सांगायला गेले तर “धरण आहे उषाला , कोरड आहे घशाला” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

डहाणू तालुक्यातील कवडास आणि सूर्या धरणाची पाण्याची वाढवण्यासाठी धरणाची रुंदीकरण काम चालू असल्या कारणाने धामणी धरणाचे पाणी हे खंडित झाले आहे. त्यामुळे येथील नदी , नाल्यांना पाणी नसल्याने ते सुके पडले आहेत. परिणामी बोअरवेल , विहीर यांमधील पाणी कमी झाले आहे . शासनाने कवडास धरणाचे काम करत असताना येथील आजूबाजूच्या वसलेल्या गावांना याचा परिणाम म्हणून पाणी टंचाई परिस्थिती निर्माण होईल यावर उपाययोजना करणे गरजेचे होते. परंतु कवडास धरणाचे या वर्षी काम चालू झाल्यापासून धामणी धरणातून पाणी सोडण्याचे बंद असल्याने या गावातील ग्रामस्थांना पाण्याच मोठा फटका बसला आहे. परिणामी येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी दूरवर असलेल्या विहिरीकडे एक ते दीड किलोमीटर धाव मारावी लागत आहे. तसेच येथे काही प्रमाणात उन्हाळी शेती केली जाते. परंतु या वर्षी पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकर्‍यांनी लावलेले पीक पाण्याविना नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे . त्यामुळे पिण्याच्या पाण्याविना शेतकर्‍यांना शेतीत सुद्धा याचा मोठा फटका बसला आहे. येथील गृहिणींना तब्बल दीड ते दोन किलोमीटर अंतरावर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. घराजवळ बोअरवेल आहे मात्र त्याला पाणी काढण्यासाठी हापसा दांडा मारणे म्हणजे मोठी कसरत करावी लागत आहे. त्यानंतरही थेंबथेंब पाणी नशिबी आहे. येथील ग्रामस्थांनी व विक्रमगड तालुका मनसे उपाध्यक्ष रघुवीर भोगाडे यांनी या संदर्भात शासनाला विनंती करत यावर तात्काळ उपाय योजना करावी अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

कोट.
“आमच्या गावातच मोठे धरण आहे. मात्र त्यामधील पाणी या वर्षी सोडण्यात आले नसल्याने नदी , नाले आटून सुखे पडले आहेत. परिणामी भूजल पातळी खाली गेल्याने आमच्या येथील बोअरवेल , विहीर यांची पाण्याची पातळी कमी झाली असून परिणामी आमच्या येथे आतापासून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.यावर शासनाने विशेष लक्ष घालून तात्काळ उपाययोजना करावी आणि आमची गंभीर पाण्याची समस्या सोडवावी.”
– रघुवीर भोगाडे , मनसे उपाध्यक्ष , विक्रमगड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -