घररायगडरायगड जिल्ह्यातील १३४ संस्थांसह २ दूध केंद्राचे ‘शटर डाऊन‘

रायगड जिल्ह्यातील १३४ संस्थांसह २ दूध केंद्राचे ‘शटर डाऊन‘

Subscribe

शेतकर्‍यांचा शेतीपूरक व्यवसाय बंद झाल्याने नुकसान

खोपोली-: शासकीय दूध डेअरी योजनेंतर्गत सन १९८२ मध्ये तत्कालीन दुग्धविकास राज्यमंत्री कै. बी. एल. पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडील दूध संकलनासाठी महाड आणि खोपोली अशी दोन केंद्र सुरू केली. (Milk institutions in Raigad district closed) राज्यात दूध उत्पादनाला एकीकडे चालना दिली जात असताना दुसरीकडे ३५-४० वर्षे जुन्या आरेच्या डेअरीत दूध संकलन आणि पिशवीबंद दूध विक्री पूर्ण बंद झाले असल्याने शेतकर्‍यांचा शेतीपूरक व्यवसाय बंद झाला आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील वाढीव दुधाची मागणी पूर्ण करता यावी आणि घटलेल्या दुधाळ जनावरांच्या संख्येतही वाढ व्हावी यासाठी केंद्र सरकारने एकात्मिक दुग्धशाळा विकास उपवन प्रकल्पांतर्गत दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात २ प्रकल्प राबविण्याचा घेतलेला निर्णय जिल्ह्यात सध्या कुठे आहे, याच्या शोधात नागरिक आहेत.

- Advertisement -

दरम्यान, याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयातील दूध संकलन प्रभारी व्यवस्थापक आणि खोपोली डेअरी व्यवस्थापक राजू म्हात्रे यांना विचारणा केली असता २० वर्षे जुन्या मशिनरी खराब झाल्याने त्या भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. तर मदर डेअरी कल्याण येथील टाकाऊ वस्तू आणि मशिनरी खोपोली दूध डेअरीमध्ये ठेवण्यात आल्या त्या २० वर्षे विनावापर कालबाह्य मशिन ऑनलाईन पद्धतीने भंगार विक्री केली आहे. खोपोली दूध डेअरीमध्ये चारच कामगार असून, सध्या उत्पादन बंद असल्याने हजेरीवर आहेत. आरे दूध डेअरीबाबत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या संस्था शेवटची घटका मोजतात                                                                                         रायगड जिल्ह्यातील १३४ दूध संस्थांसह २ दूध संघांच्या केंद्राचे शटर गेल्या काही महिन्यांपासून बंद झाले आहे. पनवेल आणि पेण तालुक्यातील प्रत्येकी १ असे २ जिल्हा दूध संघ दिवाळखोरीत, तर दूध संस्थांतील खालापुरातील ५, रोहे ८, अलिबाग ५, उरण ४, पेण १०, पनवेल १९, कर्जत १५, सुधागड २०, मुरुड २, माणगाव १०, महाड २६, म्हसळे १ आणि पोलादपुरातील ९ दूध संस्था बंद झाल्या आहेत. २१ दूध संस्थांपैकी कर्जत ३, खालापूर १, माणगाव १, रोहे ३, पाली-सुधागड ७, पनवेल १, पेण १, अलिबाग २, महाड २ अशा दूध संस्था सुरू असून, फक्त नऊच संस्था दूध संकलनात क्रियाशील आहेत. मात्र या संस्थाही शेवटची घटका मोजत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -