घरपालघरआधी महिलेची हत्या,मग करवतीने तुकडे केले,काही कुत्र्यांना टाकले

आधी महिलेची हत्या,मग करवतीने तुकडे केले,काही कुत्र्यांना टाकले

Subscribe

इमारतीत राहणार्‍या शेजारच्या घरातील रहिवाशांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी घटना स्थळावरून ताब्यात घेतले आहे.

भाईंदर :- श्रद्धा वालकर प्रकरणाला सहा महिने पूर्ण होत नाहीत तोच मीरारोड परिसरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत असलेल्या व्यक्तीने आपल्याच पार्टनरची हत्या करून तिचे तुकडे केल्याची भयंकर घटना उजेडात आली आहे. महिलेचा खून दोन ते तीन दिवसांपूर्वी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पोलिसांनी आरोपी पळून जाणाच्या तयारीत असताना त्याला ताब्यात घेतले आहे. इमारतीत राहणार्‍या शेजारच्या घरातील रहिवाशांना दुर्गंधी येत असल्याने त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी घटना स्थळावरून ताब्यात घेतले आहे.

मीरा -भाईंदर उड्डाणपुलाच्या शेजारी गीता आकाश दिप बिल्डिंग गीता नगर फेज -७, जे विंग सदनिका क्रमांक ७०४ मध्ये मागच्या तीन वर्षांपासून मनोज सहानी (वय ५६) व मयत सरस्वती वैद्य (वय ३२ ) हे जोडपे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या दोघांमध्ये झालेल्या वादाने आरोपी सहानीने सरस्वती हिची निघृण हत्या केली. त्यानंतर करवतीच्या (आरी) च्या साहाय्याने वैद्य यांच्या शरीराचे काही तुकडे तुकडे करून काही तुकडे नष्ट केले आहेत. तर काही तुकडे रस्त्यावरील कुत्र्यांना टाकल्याची माहिती मिळत आहे. तसेच शरीराचा अर्धा भाग हा घटना स्थळावर मिळून आला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी पळून जाण्याचा तयारीत असलेल्या सहानी यांना ताब्यात घेत अधिक चौकशी सुरू केली आहे. या खुनाच्या घटनेच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नयानगर पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती मीरा- भाईंदर परिमंडळ -१ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -