घर रायगड रोह्यात कंपनीच्या गोडाऊनमध्ये आग; एक कामगार जखमी

रोह्यात कंपनीच्या गोडाऊनमध्ये आग; एक कामगार जखमी

Subscribe

धाटाव औद्योगिक वसाहतीतील रोहे डाय केम कंपनीच्या युनिटमधील गोडावूनमध्ये बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आग लागली, त्यानंतर काही वेळातच एकामागून एक स्फोटाची मालिका सुरु झाली. या स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून जात प्रचंड धुराचे लोट दिसत होते. यामुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार किशोर देशमुख, पोलीस निरिक्षक प्रमोद बाबर, अग्निशमन दल, एमआयआयडीसी सहाय्यक अभियंता विनीत कांदळगावकर हे घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले.

रोहे: धाटाव औद्योगिक वसाहतीतील रोहे डाय केम कंपनीच्या युनिटमधील गोडावूनमध्ये बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आग लागली, त्यानंतर काही वेळातच एकामागून एक स्फोटाची मालिका सुरु झाली. या स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून जात प्रचंड धुराचे लोट दिसत होते. यामुळे सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार किशोर देशमुख, पोलीस निरिक्षक प्रमोद बाबर, अग्निशमन दल, एमआयआयडीसी सहाय्यक अभियंता विनीत कांदळगावकर हे घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले. दरम्यान या घटनेत एक कामगार जखमी झाला असल्याची माहिती असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे तर आगीचे कारण तपासानंतर स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले.
आगीची माहिती मिळाल्यानंतर धाटाव औद्योगिक अग्निशमन दल, रोहे नगरपरिषद अग्निशमन दल, सुप्रीम कंपनीचे अग्निशमन दल यांचे बंब घटनास्थळी येत आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले.

आमदार तटकरे यांच्याकडून पाहणी
रोहे एमआयडीसीतील रोहे डायकेमने टेकओव्हर केलेली वेलमन कंपनीतील प्लॉट नंबर दोन मधील गोडाऊनमध्ये अचानक आग लागून ही दुर्घटना घडलेली आहे. सदर दुर्घटनेमध्ये प्रयाग हशा डोलकर (३३,खारापटी) सकाळी नऊ वाजल्यापासून ड्युटीवर असताना त्याला स्फोट दुर्घटनेप्रसंगी दुखापत झाल्याने रुग्णवाहिकेद्वारे दवाखान्यात दाखल केले आहे. तर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न काही तास सुरू होते. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दरम्यान, आमदार अनिकेत तटकरे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

- Advertisement -

रोहा डाय कंपनीत उत्पादनासाठी लागणारा सर्व प्रकारचा कच्चा माल ठेवण्यात आला आहे.यामध्ये कोळश्याचा साठा असल्यामुळे वाढत्या उष्णतेमुळे प्रथम कोळशाने पेट घेतले असावा आणि त्यानंतर अन्य माल आगीच्या लपेट्यात येवून ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली असावी. यात काही रासायनिक पदार्थ ड्रममध्ये असल्यामुळे त्या ड्रमचा स्फोट होत होता. आता आगीवर पूर्णतः नियंत्रण आले असून एक कामगार जखमी झाला आहे. या घटनेची संपूर्ण चौकशी करून या मागचे खरे कारण शोधत पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे.
– केशव केंद्रे
कारखाने निरीक्षक

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -