घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

 

 

- Advertisement -

 

कैसा नेणों मोहो वाढीनला । तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला । म्हणौनि योगु हा लोपला । लोकीं इये ॥
हा मोह इतका कसा वाढला कोण जाणे; पण त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला; आणि म्हणून या लोकी हा योग बुडाला.
तोचि हा आजि आतां । तुजप्रती कुंतीसुता । सांगितला आम्हीं तत्त्वतां । भ्रांति न करीं ॥
हे कुंतीसुता, खरोखर तोच हा योग तुला आज आम्ही सांगितला आहे. तू काहीसुद्धा शंका धरू नको.
हें जीवींचें निज गुज । परी केवीं राखों तुज । जे पढियेसी तूं मज । म्हणौनियां ॥
हा योग म्हणजे माझा जीव की प्राण आहे; परंतु तुजपासून तो लपवून कसा ठेवावा? कारण, तू माझा फार आवडता भक्त आहे.
तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा । मैत्रियेचि चित्कळा । धनुर्धरा ॥
धनुर्धरा, तू केवळ प्रेमाची मूर्ती असून भक्तीचा जिव्हाळा, जिवलग मित्रत्वाचे तर केवळ जीवन;
तूं अनुसंगाचा ठावो । आतां तुज काय वंचूं जावों? । जरी संग्रामारूढ आहों । जाहलों आम्ही ॥
आणि तू माझ्या विश्वासाचे पात्र आहेस. तेव्हा तुझ्याशी मी काय प्रतारणा करू? म्हणून आपण जरी युद्धास सिद्ध झालो आहो तरी
तरी नावेक हें सहावें । गाजाबज्यही न धरावें । परी तुझें अज्ञानत्व हरावें । लागे आधीं ॥
युद्धाची गडबड चालली असताही ती क्षणभर एके बाजूस ठेवून त्यास न जुमानता प्रथम तुझे अज्ञान आम्हांस दूर केले पाहिजे.
तंव अर्जुन म्हणे श्रीहरी । माय आपुलेयाचा स्नेहो करी । एथ विस्मयो काय अवधारीं । कृपानिधी ॥
त्या वेळेस अर्जुन म्हणतो,‘हे कृपानिधे, श्रीहरि ! आईने आपल्या मुलावर प्रेम केले तर त्यांत आश्चर्य ते कोणते?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -