घरपालघरपेसा कायद्याला माझा विरोध नाही- निलेश सांबरे

पेसा कायद्याला माझा विरोध नाही- निलेश सांबरे

Subscribe

जिजाऊ संघटना भिवंडी, पालघरसह कोकणातील काही लोकसभा निवडणुका लढण्याच्या तयारीत असून त्यादृष्टीनेच या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून जिजाऊ संघटनेचे हे शक्तीप्रदर्शन होत आहे असे मानले जाते.

पालघर: पेसा कायद्याला निलेश सांबरे यांचा विरोध आहे असे सर्वत्र माझ्या नावाने विरोधकांकडुन अपप्रचार केला जात आहे. मी पेसा कायद्याविरोधात कुठलीही याचिका टाकली नसून माझ्या जिल्ह्यातील मुलांना शिक्षकांची कमतरता असताना इथले शिक्षक जिल्ह्याबाहेर सोडू नये अशी याचीका मी टाकली होती .माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांनी आरोप सिद्ध केल्यास मी जनतेसमोर मरण पत्करेन, असे आव्हान आज जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी बोईसर येथील लालोंडे येथे चार मंदिर मैदानात पालघर लोकसभा क्षेत्रासाठी आयोजित जिजाऊ संघटनेच्या भव्य निर्धार मेळाव्यात दिले . याप्रसंगी धनवंत तिवारी (सदस्य बोर्ड सल्लागार समिती नागरी विमान वाहतूक आणि रेल्वे मंत्रालय), सामाजिक कार्यकर्ते आणि मर्चंट नेव्ही अधिकारी गणेश पाटील, पालघर मुस्लिम फ्लाही तंझिमचे कार्याध्यक्ष साजिद शेख यांसह अनेक  मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
“आतापर्यंत मुक्या बहिर्यांचा पालघर जिल्हा म्हणुन अनेकांनी आमच्या या जिल्ह्याला लुटले. इथल्या आरोग्याबद्दल, इथल्या शिक्षणाबद्दल, रोजगारांच्या समस्यांबाबत ना जिल्हा प्रशासनाला घेणे देणे नाही की लोकप्रतिनिधीना. आतापर्यंत फक्त योजनांच्या नावाखाली गोर गरीब आदीवासी, शेतकरी, कष्टकरी यांची होत असलेली फसवणूक आता जिजाऊ सहन करणार नाही. आम्हाला निवडणुकांची हौस नाही. पण ज्यांना निवडून दिले त्यांनी आपली जबादारी झटकली आहे. म्हणूनच जिजाऊच्या विचारांवर चालणारा सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिजाऊ निवडणुकीला उभी करेल आणि जिंकून आणून दाखवेल असे सांगत जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे आव्हान दिले. जिजाऊ संघटना भिवंडी, पालघरसह कोकणातील काही लोकसभा निवडणुका लढण्याच्या तयारीत असून त्यादृष्टीनेच या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून जिजाऊ संघटनेचे हे शक्तीप्रदर्शन होत आहे असे मानले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -