घरपालघरस्पेनच्या आर्ट फेस्टीव्हलमध्ये जुचंद्र आहे साक्षीला

स्पेनच्या आर्ट फेस्टीव्हलमध्ये जुचंद्र आहे साक्षीला

Subscribe

यावेळी संजय पाटील यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. संजय पाटील यांनी आर्ट फेस्टिव्हलमध्ये १० फूट बाय १० फूट ची रांगोळी काढली होती.

वसईः वसईतील जुचंद्र गावातील रांगोळी कलाकाराने स्पेनमधील आर्ट फेस्टीव्हलमध्ये काढलेल्या रांगोळीने जगभरातील कलाकारांनी लक्ष वेधून घेतले होते.जुचंद्र गावातील रांगोळी कलावंत संजय नंदा पाटील यांनी स्पेनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल आर्ट फेस्टिवलमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली होती. या फेस्टीव्हलमध्ये जगभरातील १३ हून अधिक देशातील कलाकारांनी सहभागी होऊन आपली कला सादर केली होती. त्यात संजय पाटील यांनी काढलेली भौमितिक रांगोळी विशेष लक्षवेधक ठरली. यावेळी संजय पाटील यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. संजय पाटील यांनी आर्ट फेस्टिव्हलमध्ये १० फूट बाय १० फूट ची रांगोळी काढली होती.

संजय पाटील भौमितिक रांगोळीचे जनक म्हणून ओळखले जातात. जुचंद्र गाव कलाकारांचे गाव म्हणून ओळखले जाते. नाट्य कलाकार, भजन मंडळे, वारकरी मंडळे, खेळाडूंचे गाव म्हणून जुचंद्र प्रसिद्ध आहे. रांगोळी कलाकारांचे गाव म्हणून जुचंद्रची आता ओळख झाली आहे. या गावातील तरुण रांगोळी काढण्यात तरबेज आहेत. तरुण कलाकारांनी देशविदेशात आकर्षक रांगोळ्या काढून जुचंद्रचा नावलौकिक सातासमुद्रापार पोचवला आहे. संजय पाटील यांनी स्पेनमध्ये भौमितिक रांगोळी काढून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -