घरपालघरपोलीस व जनता यांच्यातील दरी मिटविण्यासाठी जनसंवाद अभियान

पोलीस व जनता यांच्यातील दरी मिटविण्यासाठी जनसंवाद अभियान

Subscribe

वाडा तालुक्यातील नाकारपाडा ( कुंभिस्ते)येथे वाडा पोलीस ठाण्याच्या वतीने जनसंवाद अभियान हा उपक्रम आज राबविण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

वाडा : विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते हे पोलिसांपर्यंत थेट पोहचतात. मात्र सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांपर्यत पोहचण्यासाठी कुणाच्या तरी मध्यस्थीची गरज लागते.सर्वसामान्य नागरिक थेट पोलिसांपर्यंत पोहचत नाही. त्यांना पोलिसांची भीती वाटते त्यामुळे पोलीस व जनता यांच्यात दरी आहे.ही दरी मिटविण्यासाठी जनसंवाद अभियान सारख्या उपक्रमांची गरज असून गाव पाड्यात असे उपक्रम राबविल्याने थेट सामान्य माणसापर्यंत पोलीस पोहचतात, त्यामुळे पोलिसांबाबतची असलेली भीती दूर होण्यास मदत होत असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नाकारपाडा येथे बोलताना दिली. वाडा तालुक्यातील नाकारपाडा ( कुंभिस्ते)येथे वाडा पोलीस ठाण्याच्या वतीने जनसंवाद अभियान हा उपक्रम आज राबविण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, पालघर जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा नकारात्मक आहे.येथील नागरिक हे संध्याकाळी दारूच्या नशेत तर्रर असतात.नशेत असल्याने ते काहीही अनुचित प्रकार करतात. साधु हत्याकांडामुळे या जिल्ह्याची प्रतिमा खराब झाली आहे. त्यामुळे दुसर्‍या जिल्ह्यातील लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन हा नकारात्मक झाला आहे. हा नकारात्मक बदल दूर करून सकारात्मक दृष्टीने पाहण्याकरता येथील नागरिकांनी व्यसनापासून दूर गेले पाहिजे.व्यसन करण्यापेक्षा आपल्या घरातील मुलांना चांगले शिक्षण द्या, शिक्षणाने तुमचे घर बदलेल घराने कुटूंब आणि कुटुंबाने गाव,ग्रामपंचायत पर्यायाने तालुका जिल्हा राज्य बदलण्यास वेळ लागणार नसल्याचा विश्वास पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

- Advertisement -

वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सुरू केलेल्या जनसंवाद अभियानाची माहिती दिली. जनसंवाद अभियानामुळे गावोगावी व्यसनमुक्ती कायदा व सुव्यवस्था आदींबाबत जनजागृती केली. याचेच फलित म्हणून नाकारपाडा या गावात दारूबंदी झाल्याचे सांगितले. दारूबंदी बरोबर जे नागरिक दारूचे व्यसन करीत होते त्यांनीही दारू पिणे बंद केले. याचबरोबर या गावात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तयार करण्यात आली असून त्याचा लाभ विद्यार्थी घेत असल्याचे सांगून जनसंवाद अभियानाचा उद्देश विषद केला. यावेळी दारू बनवणे बंद केलेल्या महिला व दारू पिणे बंद केलेले पुरूष यांचा बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गावातील तरूणांनांही पोलीस भरतीचे मार्गदर्शन पुस्तक व प्रशिक्षणासाठी ट्रक टी शर्ट वाटप करण्यात आले. जनसंवाद अभियानाचा उद्देश करणार्‍या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रमजिवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील, विनित ठाकुर यांनी आपले विचार मांडले.कार्यक्रमास समाजसेवक ओमप्रकाश शर्मा, माजी सभापती रघुनाथ माळी,श्रमजिवी चे भरत जाधव,सरपंच साधना आणे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघचौरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास जाधव, पोलीस उपनिरीक्षक सरगर व पोलीस कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -