घररायगडशिक्षकांच्या पेन्शन प्रश्नी अन्य आमदारांनी साथ दिली नाही - आमदार नागो गाणार 

शिक्षकांच्या पेन्शन प्रश्नी अन्य आमदारांनी साथ दिली नाही – आमदार नागो गाणार 

Subscribe

शिक्षकांची बंद केलेली जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी या बाबतीत आपण विधानपरिषदेत शिक्षकांची बाजू मांडताना जो पर्यंत शिक्षकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण आमदार म्हणून मिळणारी पेन्शन स्विकारणार नाही, अशी भूमिका घेतली असतांनाच इतर तर सोडाच परंतु राज्यातील अन्य शिक्षक आमदारांनीही आपल्याला साथ दिली नाही, अशी खंत नागपूरचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केली.

 

नांदगाव: शिक्षकांना अनेक प्रश्नी न्याय मिळवून देणारी संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गेली अनेक वर्षे काम करीत आहे.वेळप्रसंगी शासन दरबारी लढा देऊन परिषदेने अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना न्याय मिळवून दिला आहे.शिक्षकांची बंद केलेली जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी या बाबतीत आपण विधानपरिषदेत शिक्षकांची बाजू मांडताना जो पर्यंत शिक्षकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण आमदार म्हणून मिळणारी पेन्शन स्विकारणार नाही, अशी भूमिका घेतली असतांनाच इतर तर सोडाच परंतु राज्यातील अन्य शिक्षक आमदारांनीही आपल्याला साथ दिली नाही, अशी खंत नागपूरचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार नागो गाणार यांनी व्यक्त केली.
माणगावच्या अशोकदादा साबळे विद्यालयात अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कोकण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील शिक्षकांना गुणवंत आणि कर्तृत्ववान तसेच जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार गाणार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेणुनाथ कडू होते. श्री छत्रपती शिवाजी नुतन विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका अर्चना खोत,सर एस ए हायस्कूल मुरुडचे मुख्याध्यापक सरोज राणे, शिक्षिका मधुमती पालशेतकर यांना गुणवंत आणि कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार आमदार गाणार, वेणुनाथ कडू तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत सहकार्यवाह नरेंद्र वायकर,कोकण विभाग कार्यवाह शशी चौधरी, कोषाध्यक्ष शिवाजी भोसले, गुलाबराव पाटील,रायगड जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वालगुडे,अनिल पाटील, दिलीप उभारे तसेच परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

शिक्षकांच्या पेन्शन तथा विनाअनुदानित शाळांना अनुदान देणे बाबतीत विद्यमान शालेय शिक्षण मंत्री केसरकर आणि अर्थमंत्री फडणवीसही अनुकूल नाहीत.कोकण शिक्षक परिषदेचे आमदार म्हणून जर रामनाथ मोते असते तर त्यांनी मला हमखास साथ दिली असती.मागील वेळेस केलेली चूक पुन्हा करू नका, यावेळी परिषदेचे उमेदवार वेणूनाथ कडू यांना बहुमताने निवडून देऊ या.
– नागो गाणार,
नागपूरचे शिक्षक मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -