घरपालघरनवघर पोलिसांनी उघडकीस आणले रिक्षा चोरीचे ११ गुन्हे 

नवघर पोलिसांनी उघडकीस आणले रिक्षा चोरीचे ११ गुन्हे 

Subscribe

या गुन्हयातील ऑटोरिक्षा चोरी करणारे, चोरीचा मद्देमाल विकत घेणारे व बनावट नंबर प्लेट तयार करणारे सर्व आरोपीं असल्याचे तपासात उघड झाल्याने या गुन्हयास तपासादरम्यान भादंवि ४२०, ४६५,४६८, ४११, ३४ असे वाढीव कलम लावण्यात आले आहे.

भाईंदर :- भाईंदरच्या नवघर पोलिसांनी परिसरात चोरी झालेल्या ११ रिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस तसेच ७ लाखांचा मुदेदमाल जप्त केला आहे. नवघर पोलीस ठाण्यात पृथ्वीपाल यादव यांनी त्यांची रिक्षा चोरी झाल्याबाबत नवघर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.सं.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला होता. नवघर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार रिक्षा चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने वरिष्ठांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने नवघर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तपास करून भाईंदर पूर्व, मालवणी, गोवंडी, शिवाजीनगर, मुंबई तसेच वाई, सातारा येथून आरोपी राम शिवराम कुमार, सुरेंद्र ग्यापुरी गोस्वामी,  रुशीदेव ठाकुरप्रसाद शुक्ला, अक्साम अकरम खान, इरसाद अहमद रफातुल्ला खान,  मोहम्मद झाकीर फकीर मोहम्मद सय्यद, विजय उत्तम वाघ ऊर्फ घाटी  यांना ताब्यात घेवून त्यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने गुन्हयात अटक केली आहे.
 या गुन्हयातील ऑटोरिक्षा चोरी करणारे, चोरीचा मद्देमाल विकत घेणारे व बनावट नंबर प्लेट तयार करणारे सर्व आरोपीं असल्याचे तपासात उघड झाल्याने या गुन्हयास तपासादरम्यान भादंवि ४२०, ४६५,४६८, ४११, ३४ असे वाढीव कलम लावण्यात आले आहे. सर्व आरोपी हे सध्या पोलीस कोठडीमध्ये असून गुन्हयाचा पुढील तपास नवघर पोलीस ठाण्याचे स.पो.नि. योगेश काळे हे करीत आहेत.
या गुन्हयातील अटक आरोपींकडे तपास करून त्यांच्याकडून मालवणी, गोवंडी, शिवाजीनगर, मुंबई व सातारा अशा वेगवेगळया ठिकाणांहून ७ लाख १० हजार रुपयांच्या १३ ऑटो रिक्षा जप्त करून नवघर पोलीस ठाणे, काशिमिरा पोलीस ठाणे, वाशी पोलीस ठाणे, नवी मुंबई, एस.एच.बी. पोलीस ठाणे, मुंबई येथील रिक्षाचोरीचे एकूण ११ गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, सुशीलकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहायक पोलिस निरीक्षक योगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित लांडे, पोलीस हवालदार भुषण पाटील, पोलीस नाईक गणेश जावळे, सुरेश चव्हाण, ओंकार यादव, सुरजसिंग घुनावत, विनोद जाधव, नवनाथ घुगे यांनी केली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -