घरपालघर8 एप्रिल रोजी खासदार शरद पवार मोखाड्यात

8 एप्रिल रोजी खासदार शरद पवार मोखाड्यात

Subscribe

तसेच या पार्श्वभूमीवर या संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी करावयाच्या उपाययोजना संदर्भात आमदार भुसारा यांनी पाहणी केली असून महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापक यांच्याशी चर्चा केली आहे.

मोखाडा: खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे ८ एप्रिल रोजी मोखाडा तालुक्यात येणार असून रयत शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या नुतन संकुलाच्या उद्घाटन तसेच या महाविद्यालयाचे लोकनेते रामशेठ ठाकूर कला वाणिज्य व विज्ञान असे नामकरणही यावेळी होणार आहे. यासाठी पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनिल भुसारा यांनी दिली आहे.तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही याबाबत आमंत्रण दिले असून आमदार भुसारा यांनी तसे पत्रही दिले आहे. तर शिवसेनेचे तालुका प्रमुख तथा नगराध्यक्ष अमोल पाटील हे वेळ घेण्यास प्रयत्नशील असून अद्याप वेळ मिळाला नसला तरी पूर्वतयारी म्हणून दोन हॅलीपॅड करण्याचे ठरले आहे. तसेच या पार्श्वभूमीवर या संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी करावयाच्या उपाययोजना संदर्भात आमदार भुसारा यांनी पाहणी केली असून महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापक यांच्याशी चर्चा केली आहे.

या कार्यक्रमाला पार्किंगच्या व्यवस्थेसाठी अडचण निर्माण झाली होती.मात्र तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक भाजपचे सरचिटणीस विलास पाटील यांनी पार्कींगसाठी आपली जागा उपलब्ध करून दिली असून शैक्षणिक कार्यात ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग यामुळे आधोरेखित झाला आहे.यावेळी नगराध्यक्ष अमोल पाटील,भाजप उपाध्यक्ष तथा अर्बन बँकेचे संचालक संतोष चोथे, उपनगराध्यक्ष नवसु दिघा ,महाविद्यालयाचे प्राचार्य एल डी भोर आदी पदाधिकारी उपस्थित होते. मोखाड्यात शिक्षणाची वाणवा असताना तालुक्यातील मुख्यालय ते ग्रामीण भागात रयत शिक्षण संस्थेने शिक्षणाचे जाळे पसरवून येथील आदिवासी भागात शिक्षणाची गंगा पोहचवली. याच वेळी सुरूवातीला अतिशय कमी जागेत कमी क्षमतेच्या इमारतीत महाविद्यालय सुरू केले. यावेळी तालुक्यातील बर्‍याच दानशुरांनी जागा आणि बरीचशी मदत करुन हे महाविद्यालय सुरू झाले. आज याचा डोलारा उभा राहिला असून आता नवीन सुसज्ज संकुलासाठी रयत संस्थेकडून मोठ्याप्रमाणावर निधी उपलब्ध करून देवून खर्‍या अर्थाने आज महाविद्यालयाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -