घरपालघरटेम्पो चालकाच्या प्रसंगवधानतेमुळे विद्यार्थी बचावले

टेम्पो चालकाच्या प्रसंगवधानतेमुळे विद्यार्थी बचावले

Subscribe

यामुळे स्कूल बसमधील ४० विद्यार्थी अपघातातून सुदैवाने बचावले असून स्कूल बसच्या चालकाचा निष्काळजीपणा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला असता.

बोईसर : बोईसर चिल्हार मार्गावरील गुंदले येथील सेंट फ्रान्सिस शाळेचे विद्यार्थी भरलेल्या बसचा अपघात टेम्पो चालकाच्या प्रसंगवधानतेमुळे थोडक्यात टळला.गुंदले येथील सेंट फ्रान्सिस या इंग्रजी माध्यमातील शाळेचे ४० विद्यार्थी भरलेली बस चालकाने डावी उजवीकडून वाहन येते की नाही हे न बघता प्रवेशद्वारातून निष्काळजीपणाने थेट बोईसर चिल्हार मार्गावर आणली. यावेळी रस्त्यावर अचानक स्कूल बस समोर आल्याचे बघून समोरून भरधाव वेगाने येणार्‍या टेम्पो चालकाने प्रसंगवधान दाखवत टेम्पोचा ब्रेक करकचून दाबत शाळेच्या बसला धडक देण्यापासून वाचवले.यामुळे स्कूल बसमधील ४० विद्यार्थी अपघातातून सुदैवाने बचावले असून स्कूल बसच्या चालकाचा निष्काळजीपणा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला असता.
गुंदले ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या सेंट फ्रान्सिस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतीळ विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी सोडण्यासाठी शाळेतून निघालेली बस बोईसर चिल्हार मार्गावर अचानक समोर आल्याने टेम्पो चालकाने प्रसंगावधान राखत आपल्या वाहनाचा वेग कमी करून टेम्पो स्कूल बसला धडकता धडकता वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी भरल्याची बाब समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -