घरपालघरपोलीस शिपाई पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा ; पालघर जिल्ह्यात २११ रिक्त...

पोलीस शिपाई पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा ; पालघर जिल्ह्यात २११ रिक्त जागांवर होणार भरती

Subscribe

एक नोव्हेंबरपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. एक नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

बोईसर: संपूर्ण महाराष्ट्रात एकूण १४९५६ रिक्त जागांवर पोलीस शिपाई पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.यामध्ये पालघर जिल्ह्यातील २११ पदांचा समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या बैठकीनंतर राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार असल्याचे सांगितले होते. राज्य पोलीस मुख्यालयाने २०२१ मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. यात पालघर पोलीस दलात दलात २११ शिपाई संवर्गातील पदे रिक्त असून संपूर्ण राज्यात १४ हजार ९५६ पोलीस शिपाई पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात ०५ हजार ४६८ पदांचा समावेश आहे. एक नोव्हेंबरपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. एक नोव्हेंबर रोजी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तशा सुचना पोलीस महासंचालकांकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. ०३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर यादरम्यान पोलीस भरतीसाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पोलीस भरतीबाबतची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर मिळणार आहे

पालघर जिल्ह्यात कोणत्या प्रवर्गाला किती जागा
अनुसूचीत जमाती- ४६,अनुसूचीत जाती- २१,विमुक्त जाती (अ)- ०६, भ.ज.(ब)- ०५,भ.ज.(क)- ०७,भ.ज.(ड)- ०४, विमाप्र- ०४, इमाव- ३२, इडब्लूएस- २१, खुला- ६५

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -