घरपालघरहजारो अंगणवाडी कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ओवाळणीकरीता जाणार

हजारो अंगणवाडी कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ओवाळणीकरीता जाणार

Subscribe

त्यांना मिळणार्‍या मानधनामध्ये त्यांचे संसार चालू शकत नाहीत. कुपोषण दूर करण्यासाठी नेमलेले कर्मचारी स्वतः कुपोषीत आहेत.

डहाणू : २६ ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे. त्यादिवशी हजारो अंगणवाडी भगिनी मुख्यमंत्री असलेल्या आपल्या भाऊरायाला ओवाळण्यासाठी दु. ३ वा. मा. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी, मानधनवाढीची भेट मागण्याकरीता ओवाळणीसाठी जाणार आहेत,असे अंगणवाडी संघटनेकडून सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्यात दोन लाख अंगणवाडी कर्मचारी असून त्यापैकी बहुसंख्य दारिद्रय रेषेखालील, अल्प वेतन गटांतील व गरीब घरातील आहेत. अंगणवाडी कर्मचारी लाभार्थ्यांना पोषक आहार, पूर्वप्राथमिक शिक्षण, आरोग्य सेवा, संदर्भिय सेवा पुरवितात. त्यांना किमान वेतन मिळत नाही. जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडले असले तरी त्यांना महागाई भत्ता मिळत नाही. त्यांना मिळणार्‍या मानधनामध्ये त्यांचे संसार चालू शकत नाहीत. कुपोषण दूर करण्यासाठी नेमलेले कर्मचारी स्वतः कुपोषीत आहेत.

नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर, कृति समितीच्या नेत्यांशी अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधन वाढीबद्दल सविस्तर चर्चा केली होती. त्यानंतर महाराष्ट्र सरकार अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनामध्ये वाढ करणार, अशा प्रकारची निवेदने मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व अन्य मंत्री यांनी केली आहेत. सर्व वर्तमानपत्रांत, टिव्ही इ. समाजमाध्यमां मध्ये अंगणवाडी कर्मचार्‍यांना मानधनवाढ देण्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी कर्मचार्‍यांना मानधन वाढीबाबत सरकार दिवाळीपूर्वी घोषणा करील, असा त्यांना विश्वास वाटत होता. कॅबिनेटच्या मिटींगच्या दिवशी अंगणवाडी कर्मचारी टिव्ही समोर बसून मानधनवाढीच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होत्या. परंतु मानधनवाढीची घोषणा न केल्यामुळे लक्षावधी अंगणवाडी कर्मचा यांचा अपेक्षाभंग झाला व त्यामुळे त्या व्यथित झाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -