वसई समुद्र दुर्घटना,अजून एकाचा मृतदेह सापडला

पण पाण्याचा अंदाज न आल्याने ते लाटेसोबत समुद्रात वाहून गेले. ही घटना त्यांच्या दोन मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला.

वसई: नालासोपारा येथील चार तरुण पोहण्यासाठी कळंब समुद्रात पोहायला गेले होते. त्यातील दोन जण बुडाले होते. रात्री एकाचा मृतदेह हाती लागला होता. तर दुसर्‍याचा मृतदेह सोमवारी दुपारी हाती लागला. रोशन गावडे आणि सौरभ पाल अशी त्यांची नावे आहेत. यातील रोशनचा मृतदेह रात्री भुईगाव समुद्र किनारी हाती लागला होता. तर सौरभ पालचा मृतदेह सोमवारी दुपारी अग्निशमन दलाच्या हाती लागला. नालासोपाराजवळील बिलालपाडा येथे राहणारे रोशन आणि सौरभ हे दोन तरुण आपल्या आणखी दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी वसईतील कळंब समुद्रकिनारी रविवारी संध्याकाळी चारच्या सुमारास गेले होते. रोशन आणि सौरभ पोहायला उतरले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्याने ते लाटेसोबत समुद्रात वाहून गेले. ही घटना त्यांच्या दोन मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला.

पण लाईफ गार्ड नसल्याने वेळी मदत मिळू शकली नाही. वसई- विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन शोध कार्य हाती घेतले. रात्री रोशनचा मृतदेह हाती लागला. सोमवारी सौरभचाही मृतदेह हाती लागला.