पुढील दोन दिवस पावसाची शक्यता

जनावरांचा चारा आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे.

सफाळे: भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात
13 आणि 14 मार्च दरम्यान ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता वर्तवली आहे.15 मार्च रोजी मेघ गर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.त्यानंतर 16 मार्च रोजी तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघ गर्जना व वादळी वार्‍यासह हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा इशारा जिल्हा कृषि हवामान केंद्र, ग्रामीण कृषि मौसम सेवा, कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, पालघर यांच्याकडून देण्यात आला आहे. पुढील चार दिवस पावसाची शक्यता लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या रब्बी पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. परिपक्व झालेली फळे व भाजीपाला काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. जनावरांचा चारा आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे.