घरफोटोगॅलरीमविआ आमदारांचे विधिमंडळ प्रवेशद्वारावर ‘दिंडी आंदोलन’

मविआ आमदारांचे विधिमंडळ प्रवेशद्वारावर ‘दिंडी आंदोलन’

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागपूर येथील एनआयटी भूखंड घोटाळा तसेच कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांच्या गायरान जमीन गैरप्रकाराबद्दल विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज, मंगळवारी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारे अनोखे ‘दिंडी आंदोलन केले.विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंत्र्यांच्या विरोधात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. शेतकरी हैराण सरकार खातो गायरान… खोके लुटा कधी गायरान लुटा… सुरतला चला, कधी गुवाहटीला चला… 50 द्या कुणी 82 द्या, शिंदे सरकारला द्या… भूखंड घ्या, कुणी गायरान घ्या, सत्तारला द्या, कुणी राठोडला द्या… गद्दार बोलो कभी सत्तार बोलो… राजीनामा द्या राजीनामा द्या, भूखंडाचा श्रीखंड खाणारे राजीनामा द्या… जनतेकडून पैसे घेणार्‍या अब्दुल सत्तार यांचा निषेध… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंदोलन केले.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -