घरराजकारणगुजरात निवडणूकपोकळ आश्वासन देणाऱ्यांना गुजरातने नाकारले, विजयाच्या घोषणेआधीच अमित शाहांकडूनही जल्लोष

पोकळ आश्वासन देणाऱ्यांना गुजरातने नाकारले, विजयाच्या घोषणेआधीच अमित शाहांकडूनही जल्लोष

Subscribe

Gujarat Election Result | पोकळ आश्वासने देणार्‍यांना, फुकटचे आणि तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍यांना गुजरातने नाकारले. विकास आणि लोककल्याणाचा पाठपुरावा करणार्‍यांना भाजपाने स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाला अभूतपूर्व यश मिळवून दिलं आहे, असं अमित शाहा म्हणाले.

अहमदाबाद – गुजरात निवडणुकीचा निकालाबाबत अधिकृत घोषणा जाहीर होण्याआधीच भाजपाच्या गटात आतिषबाजी सुरू झाली आहे. गुजरातमधील निकालावरून भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत आहेत. त्यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री यांनी गुजराती जनतेचे आभार मानले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. तसंच, पोकळ आश्वासने देणार्‍यांना, फुकटचे आणि तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍यांना गुजरातने नाकारले आहे, असंही अमित शाहा म्हणाले.

पोकळ आश्वासने देणार्‍यांना, फुकटचे आणि तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍यांना गुजरातने नाकारले. विकास आणि लोककल्याणाचा पाठपुरावा करणार्‍यांना भाजपाने स्वीकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाला अभूतपूर्व यश मिळवून दिलं आहे, असं अमित शाहा म्हणाले.

- Advertisement -


महिला, तरुण आणि शेतकरी मनापासून भाजपासोबत असल्याचं या विजयातून स्पष्ट होत आहे. गुजरातने नेहमीच इतिहास घडवण्याचे काम केले आहे. गेल्या दोन दशकात मोदीजींच्या नेतृत्वाखाली भाजपने गुजरातमध्ये विकासाचे सर्व विक्रम मोडीत काढले आणि आज गुजरातच्या जनतेने भाजपला आशीर्वाद देत विजयाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत, असं ट्वीट अमित शाहा यांनी केले आहे.


गुजरातमध्ये भाजपा १५७ जागांवर, काँग्रेस १६, आप ०५ आणि अपक्ष ०४ जागांवर आघाडीवर आहे. याचाच अर्थ गुजरातमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. गेल्या ६० वर्षांतील ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भाजपाकडून जल्लोष केला जात आहे. भाजपाच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून उत्साहाला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -


गुजरातमध्ये १८२ जागांवर मतदान झाले आहे. या जागांसाठी १६२१ उमेदवारांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल पुन्हा विजयी झाल्याने त्यांनाच पुढचा मुख्यमंत्री बनवणार असल्याचे भाजपा गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी घोषित केले आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -