घरराजकारणलोकसभा 2024Lok Sabha 2024 : ममता बॅनर्जींचा एकला चलो रेचा नारा, तृणमूलकडून 42...

Lok Sabha 2024 : ममता बॅनर्जींचा एकला चलो रेचा नारा, तृणमूलकडून 42 जागांवर उमेदवार जाहीर

Subscribe

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा या येत्या काही दिवसांत जाहीर होऊ शकतात. परंतु, त्याआधीच देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपा आणि काँग्रेसकडून आपली पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता ममता बनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तृणमूलने 42 च्या 42 जागांवर उमेदवार जाहीर केल्याने पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी संपुष्टात आल्याची चर्चा रंगली आहे. (Lok Sabha 2024: Mamata Banerjee Announces Trinamool Congress Candidates for 42 Seats)

हेही वाचा… LokSabha 2024 : ‘शिल्लक शिवसेनेच्या प्रमुखांनी…’; कीर्तिकरांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस नेता भडकला

- Advertisement -

ममता बॅनर्जी यांनी आज (ता. 10 मार्च) दुपारी उमेदवारांची यादी जाहीर केली. यामुळे पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीसोबत निवडणूक न लढवतचा ममता यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधून दिग्गज लोकांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. महुआ मोईत्रा, भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण, काँग्रेसचे द्वितीय क्रमांकाचे नेते अभिषेक बॅनर्जी, सुगता रॉय, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा अशांना तृणमूलने उमेदवारी दिली आहे. ज्यामुळे पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांना वेगळाच रंग चढल्याचे पाहायला मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जागावाटपावर चर्चा चालू होती. काँग्रेस पक्षाला तृणमूल पक्ष अवघ्या दोन जागा देण्यास तयार होता. तर काँग्रेसला आणखी जागा हव्या होत्या. जागावाटपावर कोणताही ठोस तोडगा निघत नसल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी आम्ही लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढवणार आहोत, अशी घोषणा केली होती. तसेच आमची इंडिया आघाडीशी जागावाटपासंदर्भात कोणतीही चर्चा चालू नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतर संयमाची भूमिका घेत काँग्रेसने तृणमूल काँग्रेसशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. या चर्चेतून कोणताही ठोस निष्कर्ष निघत नसल्यामुळे आता शेवटी तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालच्या सर्वच जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

तृणमूलच्या उमेदवाराचीं यादी

  1. कूचेबिहार – जगदीशचंद्र बसुनिया
  2. अलीपुरद्वार – प्रकाश शीख बराईक
  3. जलपाईगुडी – निर्मल चंद्र राय
  4. दार्जिलिंग – गोपाल लामा
  5. रायगंज- कृष्णा कल्याणी
  6. बालूरघाट – बिप्लब मित्र
  7. मालदा उत्तोर – प्रसून बॅनर्जी
  8. मालदा दक्षिण – सहनवाज अली रेहान
  9. जंगीपूर- खलीलुर रहमान
  10. बेरहामपूर- युसूफ पठाण
  11. मुर्शिदाबाद – अबू ताहेर खान
  12. कृष्णनगर- मोहुआ मोईत्रा
  13. राणाघाट – मुकुटमणी अधिकारी
  14. बोंगा – विश्वजीत दास
  15. बॅरकपूर – पार्थ भौमिक
  16. दम दम – प्रा सौगता रॉय
  17. बारासात – डॉक्टर काकोली घोष दस्तीदार
  18. बशीरहाट – हाजी नुरुल इस्लाम
  19. जयनगर- प्रतिमा मंडळ
  20. मथुरापूर – बापी हलदर
  21. डायमंड हार्बर – अभिषेक बॅनर्जी
  22. जादवपूर- सयोनी घोष
  23. कोलजकाता दक्षिण – माला रॉय
  24. कोलकाता उत्तर – सुदीप बॅनर्जी
  25. हावडा – प्रसून बॅनर्जी (माजी फुटबॉलपटू)
  26. उलुबेरिया- सजदा अहमद
  27. श्रीरामपूर- कालियान बॅनर्जी
  28. हुगली – रचना बॅनर्जी
  29. आरामबाग- मिताली बाग
  30. तमलूक – देबांगशु भट्टाचार्य
  31. कंठी – उत्तम बारीक
  32. घाटाळ- दीपक अधिकारी (देव)
  33. झारग्राम – कालीपोडो सोरेन
  34. मेदनीपूर- जून मैला
  35. पुरुलिया – शांतीराम महतो
  36. बांकुरा – अरुप चक्रवर्ती
  37. बर्दवान पूरबा- डॉक्टर शर्मिला सरकार
  38. बर्दवान दुर्गापूर- कीर्ती आझाद
  39. आसनसोल- शत्रुघ्न सिन्हा
  40. बोलपुल- असितकुमार मल
  41. बीरभूम – शताब्दी रॉय
  42. बिष्णुपूर- सुजाता मंडल खा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -