घरराजकारणLoksabha 2024: प्रकाश आंबेडकरांनी घेतली जरांगेंची भेट; आंबेडकरांच्या मनात काहीतरी वेगळंच

Loksabha 2024: प्रकाश आंबेडकरांनी घेतली जरांगेंची भेट; आंबेडकरांच्या मनात काहीतरी वेगळंच

Subscribe

अकोला: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. पत्रकार परिषद घेत ते स्वतंत्र लढणार की मविआसोबत जाणार याबाबत खुलासा करणार आहेत. त्यातच आंबेडकर यांनी काल, मनोज जरांगे पाटील यांची भेट देखील घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यताही वर्तवली जात आहे. (Loksabha 2024 Prakash Ambedkar visits Manoj Jarange Patil Ambedkar had something else in mind)

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने वंचितसोबत चर्चा सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. वंचितने प्रस्ताव दिलेल्या जागांवर वाटाघाटीदेखील सुरू होत्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही वंचित मविआसोबत यावी, यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. तशा अनेक बैठकाही मविआ आणि वंचित यांच्यात झाल्या. परंतु, काही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर काय घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisement -

मंगळवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत प्रकाश आंबेडकरांच्या पक्षांचं अकोल्यात बैठकांचं सत्र चाललं आहे. या बैठकीला प्रकाश आंबेडकरांसह प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर पक्षाच्या नेत्या अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, फारुख अहमद, मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, ज्येष्ठ नेते अशोक सोनोने यांची उपस्थिती होती.

रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीनंतर आज आंबेडकर महाविकास आघाडीत जाणार? की स्वतंत्र लढणार याचा निर्णय होणार आहे. काल आघाडीने आंबेडकरांना दिलेल्या पाच जागांच्या नवा प्रस्तावानंतर प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

- Advertisement -

वंचितला चारऐवजी पाच जागांचा प्रस्ताव

वंचित बहुजन आघाडी संदर्भात महाविकास आघाडीची वेट अँड वॉच भूमिका असल्याचं दिसून येत आहे. वंचितला आघाडीने चारऐवजी पाच जागांचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती देखील समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाची यादी ही वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेनंतर, म्हणजे बुधवारी जाहीर होणार आहे. भिवंडी, सांगली आणि जालना यासारख्या तिढा असलेल्या जागांचा प्रश्न सुटल्याचीही माहिती आहे.

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : महायुतीत डोकेदुखी वाढली, मुख्यमंत्री शिंदे चार जागांसाठी कमालीचे आग्रही)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -