घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : महायुतीत डोकेदुखी वाढली, मुख्यमंत्री शिंदे चार जागांसाठी कमालीचे...

Lok Sabha 2024 : महायुतीत डोकेदुखी वाढली, मुख्यमंत्री शिंदे चार जागांसाठी कमालीचे आग्रही

Subscribe

लोकसभेच्या जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असून दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिक या लोकसभेच्या चार मतदारसंघांवरुन शिवसेना आणि भाजप यांच्यातील तिढा अद्याप सुटलेला नाही.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन 10 दिवसांचा कालावधी लोटला आहे. असे असले तरी आता महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही. सध्या लोकसभेच्या जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असून दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिक या लोकसभेच्या चार मतदारसंघांवरुन शिवसेना आणि भाजप यांच्यातील तिढा अद्याप सुटलेला नाही. यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चार मतदारसंघामध्ये निवडून येण्यासाठी आवश्यक असलेले समीकरण याची मांडणी भाजपासमोर केल्याचे खात्रिलायकरित्या समजते. (Lok Sabha 2024: Chief Minister Eknath Shinde insists on four seats)

हेही वाचा… Vijay Shivtare : अजित पवारांच्या विरोधात जाणे पडणार भारी, शिवसेना शिवतारेंना धाडणार शिस्तभंगाची नोटीस

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा कायम ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपामध्ये या चार जागांवरुन धुसफूस आहे. या दोन्ही पक्षांनी या चार जागांवर दावा केला आहे. मात्र, शिवसेनेने आपल्या इच्छुक उमेदवारांची नावेच भाजपाकडे पाठवल्याचे समजते. या चारही जागा जिंकण्यासाठी लागणारे समीकरण आणि योग्य उमेदवार शिवसेनेकडे आहेत, असा युक्तिवादही शिंदे यांनी भाजपाकडे केल्याचे समजते. या जागा शिवसेनेलाच मिळाव्यात असा आग्रहही शिंदे गटाकडून भाजपाकडे करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर, ज्या चार जागांसाठी शिंदे यांनी आग्रह धरला आहे त्या चारही लोकसभेत शिवसेनेचे खासदार आहेत. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत, ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे, शिर्डीत सदाशिव लोखंडे आणि नाशिक लोकसभेत हेमंत गोडसे खासदार आहेत. यापैकी अरविंद सावंत आणि राजन विचारे हे सध्या ठाकरे गटात आहेत. तर उर्वरीत दोघे शिंदे गटाकडे आहेत.

दक्षिण मुंबईसह नाशिक, ठाणे आणि शिर्डीची जागा लढवण्याबाबत एकनाथ शिंदे ठाम आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार असावा, यासाठी पक्षाचे स्थानिक नेते गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील आहेत. मात्र, शिंदे हे स्वत: ठाण्यात राहतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ठाणे लोकसभेची जागा प्रतिष्ठेची आहे. परिणामी एकनाथ शिंदे ही जागा सोडण्यासाठी तयार नाहीत. तर नाशिकमध्ये श्रीकांत शिंदे यांनी परस्पर हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित केल्याने भाजपाचे शांतीगिरी महाराज नाराज झाले आहेत. त्यांनी याठिकाणी अपक्ष लढण्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी या चारही जागा आपण कशा जिंकून आणू शकतो, याची माहिती भाजपासमोर ठेवल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -