घरताज्या घडामोडीLok Sabha : महायुती-महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं अद्याप ठरेना; दोघेही वेट अॅण्ड वॉचच्या...

Lok Sabha : महायुती-महाविकास आघाडीच्या जागावाटपाचं अद्याप ठरेना; दोघेही वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत

Subscribe

लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर झाला असून, सर्वच पक्षश्रेष्ठींनी योग्य उमेदवारांच्या शोधासाठी कंबर कसली आहे. अशातच भाजप काँग्रेसने आपल्या पहिल्या याद्या जाहीर केलेल्या आहेत. पण अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही.

लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर झाला असून, सर्वच पक्षश्रेष्ठींनी योग्य उमेदवारांच्या शोधासाठी कंबर कसली आहे. अशातच भाजप काँग्रेसने आपल्या पहिल्या याद्या जाहीर केलेल्या आहेत. पण अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. असं असलं तरी, सद्यस्थिती पहिला आपण उमेदवारी जाहीर करा मग आम्ही अशीच भूमिका युती-आघाडीची पाहायला मिळत आहे. (seat sharing formula of mahayuti and mahavikas aghadi not yet decided)

लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन 10 दिवस उलटल्यानंतरही महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीचे संपूर्ण जागावाटप जाहीर झालेले नाही. जवळपास महिनाभर महायुती-मविआचा हा घोळ गेला सुरू आहे. जागावाटप जाहीर करण्यासाठी रोज नवी तारीख देण्यात येत आहे. आता महायुतीचे चित्र गुरुवार, 28 मार्च रोजी स्पष्ट होणार असल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यामुळे गुरूवारी तरी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटणार का, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

भिवंडी आणि सांगली या दोन जागांवरून महाविकास आघाडीतील पेचही अद्याप सुटलेला नाही. तसेच, वंचितच्या सहभागाचा विषय आता संपल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले होते. मात्र वंचितला सहभागी करून घेण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे. असे असताना नुसती जागांची चर्चा न करता लेखी पत्र द्यावे, अशी भूमिका वंचितने घेतली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाची पहिली यादी मंगळवारी जाहीर केली जाईल, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते. मात्र अद्याप ही जागावाटप झालेली नाही. त्यामुळे आज ही यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, ठाकरे गटाची यादी जाहीर झाल्यानंतरच शिंदे गट उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे. तर शिंदे गटाने विद्यमान खासदारांना तिकीट नाकारल्यास त्यांना दरवाजा उघडण्याची ठाकरे गटाने तयारी केली आहे. शिंदे गटातून परतीचा ओघ सुरू झाल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी ही रणनीती आखली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Koshyari : उद्योगपती अंबानींकडून माजी राज्यपालांना 15 कोटींच्या देणग्या; निनावी पत्राने खळबळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -