घररायगडखोपोलीनजिक भरधाव ट्रकची चार वाहनांना धडक

खोपोलीनजिक भरधाव ट्रकची चार वाहनांना धडक

Subscribe

या घटनेत चार वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या विचित्र अपघातानंतर अपघातस्थळावरून ट्रक चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

खोपोली:  मुंबई – पुणे द्रूतगती मार्गावर खोपोलीनजिक एका भरधाव ट्रकने या मार्गावरुन जाणार्‍या चार वाहनांना धडक दिल्याची विचित्र घटना घडली. या घटनेत चार वाहनांचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या विचित्र अपघातानंतर अपघातस्थळावरून ट्रक चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पुण्याहून मुंबईला जोडण्यासाठी आणि जलद प्रवासासाठी मुंबई, पुणे द्रूतगती मार्ग बनवण्यात आला आहे. यामुळे मुंबई पुणे हे अंतर प्रवासासाठी सोपे आणि जलद मार्ग बनला आहे. मात्र सध्या हा मार्ग अपघाताचा मार्ग बनला असल्याचे विविध स्वरुपात घडणार्‍या अपघातांवरुन दिसून येते. अशीच घटना शुक्रवारी सकाळी वाजताच्या दरम्यान घडली आहे. एका भरधाव ट्रकने या मार्गावरून पुण्याहून मुंबईकडेे मार्गस्थ होणार्‍या इतर चार वाहनांना मागून
जोरदार धडक दिली. या घटनेनंतर ट्रकचालकाने ट्रकसह पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच संबंधित चालक ास ट्रकसह ताब्यात घेतले आहे. दरम्यान अपघातग्रस्त चार वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
आयआरबी, महामार्ग पोलिस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था यांनी घटनास्थळी तत्काळ मदत कार्य केल्याने वाहतूक सुरळीत झाली.

बेशिस्तपणा अपघाताना कारणीभूत
मुंबई – पुणे द्रूतगती मार्गावर सातत्याने होणारे अपघात हे वाहतूक नियम धाब्यावर बसवल्याने होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी वाहतूक व्यवस्थापनाने अनेक उपाय योजना केल्या आहेत, मात्र अपघातानाची मालिका सुरूच आहे. अधिक गतीने वाहन चालवणे, चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणे, लेनची शिस्त न पाळणे, नशेमध्ये वाहन चालवणे यासारख्या बेशिस्त गोष्टी अपघाताना कारणीभूत ठरत असल्याची माहिती पोलिसांच्या वाहतूक शाखकडून देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -