घररायगडरस्ता सुरक्षेसाठी जनजागृती आवश्यक; उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांचे प्रतिपादन

रस्ता सुरक्षेसाठी जनजागृती आवश्यक; उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांचे प्रतिपादन

Subscribe

जगातील विकसित देशांच्या तुलनेत भारतात रस्ते अपघातांची संख्या तिप्पट असून रस्ते अपघातांमुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सुरक्षा नियमांचे पालन करणे हे होय. तसेचअपघातांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा पंधरवडा एक मोठा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आहे. मात्र त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन असे प्रतिपादन जिल्ह्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी येथे केले.

अलिबाग: जगातील विकसित देशांच्या तुलनेत भारतात रस्ते अपघातांची संख्या तिप्पट असून रस्ते अपघातांमुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सुरक्षा नियमांचे पालन करणे हे होय. तसेचअपघातांना आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षा पंधरवडा एक मोठा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आहे. मात्र त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे, असे प्रतिपादन असे प्रतिपादन जिल्ह्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी येथे केले. अलिबाग आगार येथे ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा ’; सुरक्षितता अभियान सन-२०२३ चा शुभारंभ बुधवारी करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, मोटार वाहन निरीक्षक शशिकांत तिरसे, जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, राज्य परिवहन रायगड विभागाचे विभाग नियंत्रक पंकज ढावरे, विभागीय वाहतूक अधिकारी प्रशांत खरे, अलिबाग आगार व्यवस्थापक अजय वनारसे, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहनधिकारी माधव सुर्यवंशी तसेच उपप्रादेशिक विभागाचे, राज्य परिवहन मंडळाचे इतर अधिकारी-कर्मचारी, चालक,वाहक, तांत्रिक विभागाचे कर्मचारी, जेएसएम महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा फक्त केवळ वैचारिक संकल्प नसून जीवन सुरक्षित ठेवण्याची ही एक मोठी मोहीम आहे. रस्ते अपघात कमी व्हावेत आणि पादचार्‍यांनी वाहन चालवताना नियमांचे पालन करावे या उद्देशाने ११ ते २५ जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येणार्‍या रस्ता सुरक्षा पंधरवड्यात विविध उपक्रम परिवहन विभागाच्यावतीने आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये वाहतूक पोलिस,आरोग्य, माहिती आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यासोबतच परिवहन प्राधिकरण, जिल्हा प्राधिकरण, स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे. आकडेवारीच्या माध्यमातून रस्त्यांवर पसरलेल्या मृत्यूच्या सापळ्याचा अभ्यास केला, तर आंतरराष्ट्रीय रस्ते संघटनेच्या अहवालानुसार, जगभरात दरवर्षी १२.५ लाख लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. सर्वात चिंतेची बाब म्हणजे यामध्ये भारताचा वाटा १० टक्क्यांहून अधिक आहे, असे उप प्रादेशिक परिवहनधिकारी देवकाते म्हणाले. मोटर वाहन निरीक्षक तिरसे, विभागीय नियंत्रक ढावरे, जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक पत्की यांनी ही यावेळी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले. आगार प्रमुख वणारसे यांनी आभार मानले.

४० टक्के मृत्यू दुचाकी आणि ट्रकमुळे
आतापर्यंत झालेल्या अपघातांमागे दारू, ड्रग्सचा वापर, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे,गर्दी आणि थकवा इत्यादींचा समावेश आहे. भारतासारख्या देशात जिथे रस्ते अपघातांचा आलेख एवढा उंचावला आहे की सीट बेल्ट आणि हेल्मेटचा वापर पोलिसांकडून चालना होऊ नये म्हणून केला जातो, तिथे ही सुरक्षा उपकरणे न वापरल्याने अशा घटनांमध्ये आणखी भर पडते. अलीकडील अहवालानुसार, आपल्या देशात सुमारे ४० टक्के मृत्यू दुचाकी आणि ट्रकमुळे होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

- Advertisement -

७३ पैकी ४८ अपघातांना चालक जबाबदार
सन २०२१ मध्ये एसटीचे ५१ अपघात झालेले होते, तर सन २०२२ मध्ये ७३ अपघात झालेले आहेत. म्हणजेच या वर्षी मागील वर्षांपेक्षा २२ अपघात जास्त झालेले आहेत. ७३ पैकी ४८ अपघातांमध्ये एसटी चालक जबाबदार आहेत. सन २०२२ मध्ये घडलेल्या अपघातांमध्ये बसमधील आणि अन्य वाहनातील एकूण जखमींची संख्या १०१ आहे. अपघातांमध्ये एकूण ७ व्यक्ती मयत झाल्या असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

चालक हा मुद्दामहून अपघात करत नाही.अलिबाग डेपो हा उत्कृष्ट म्हणून गणला गेला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे.एसटीचे अपघात हे क्वचित चालकामुळे झालेले आहेत.अलिबागचे आगारप्रमुख अजय वणारसे यांचे जिल्ह्यात नव्हे तर राज्यात उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांचे नाव आहे.अपघातामुळे अपघाताग्रस्त व्यक्तींचे व आपलेही अपरिमित नुकसान होते, यासाठी चालक बंधुनी अपघात कसे टाळता येतील या दृष्टीने प्रयत्न करावेत.
– मनोज सानप
जिल्हा माहिती अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -