घररायगडडोंबिवलीतील सहलीच्या बसचा बोरघाटात ब्रेक फेल; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

डोंबिवलीतील सहलीच्या बसचा बोरघाटात ब्रेक फेल; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Subscribe

कार्ला येथील एकवीरा देवीचे दर्शन करून डोंबिवली येथील सहलीची बस जुन्या मार्गावरून बोरघाटातून शिंगरोबा देवस्थानच्या विरुद्ध दिशेने उतरत असताना बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा वेगावरील नियंत्रण सुटला यावेळी बस दरीत कोसळण्याची शक्यता होती, मात्र सुदैवाने येथील लोखंडी रेलिंग आणि झाडाला बस अडकल्याने मोठा अनर्थ टळला.

खोपोली: कार्ला येथील एकवीरा देवीचे दर्शन करून डोंबिवली येथील सहलीची बस जुन्या मार्गावरून बोरघाटातून शिंगरोबा देवस्थानच्या विरुद्ध दिशेने उतरत असताना बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा वेगावरील नियंत्रण सुटला यावेळी बस दरीत कोसळण्याची शक्यता होती, मात्र सुदैवाने येथील लोखंडी रेलिंग आणि झाडाला बस अडकल्याने मोठा अनर्थ टळला. बसमध्ये ६ शिक्षक आणि ६४ विद्यार्थी होते. दरम्यान, तातडीने मदतकार्य मिळाल्यामुळे सर्वाना सुखरूप गगनगिरी वृद्ध आश्रमात हालविण्यात आले आहे.बसचालकाच्या चुकमुळे महिन्याभरातील दुसरा आपघात असल्याने पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
या सर्वांना अ‍ॅम्बुलन्सच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना गगनगिरी आश्रमात सुखरूप आणण्यात आले आहे. खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार,वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक गौरी मोरे, बोरघाट पोलीस यंत्रणेचे पोलिस उपनिरीक्षक योगेश भोसले आणि महेश चव्हाण,आयआरबीचे सेफ्टी ऑफिसर शिंदे आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते कैलास गायकवाड यांनी तातडीने उपायोजना राबवल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

बस दरीच्या दिशेने जात असताना झाडाला धडकून अडकली

- Advertisement -

कोपर, डोंबिवलीतील च.रू.बामा म्हात्रे विद्यामंदिर या शाळेची तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची सहल घेऊ गेलेली बस (एमएच०४/एचवाय ३५७१) एकवीरा देवीच्या दर्शनानंतर गगनगिरी आश्रम खोपोली येथे जात असताना शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील घाटामध्ये त्यांच्या बसचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीच्या दिशेने जात असताना येथील लोखंडी रेलिंग आणि झाडाला धडकून अडकली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -