दिल्ली महापालिका बनली आखाडा; असे काय घडले?

दिल्ली पालिकेतील महापौर व उप महापौर निवड शुक्रवारी होणार होती. त्यात उप राज्यपाल यांनी दहा स्विकृत नगरसेवकांना शपथ देण्यास सुरुवात केली. त्यावरुन वाद सुरु झाला. आपचे नगरसेवक पुढे आले व त्यांनी नगरसेवक नगरसेवक अशी घोषणा द्यायला सुरुवात केली. स्विकृत नगरसेवकांना शपथ देण्याचा आपच्या नगरसेवकांनी विरोध केला. आधी नियुक्तीत नगरसेवकांना शपथ द्या, अशी मागणी आपच्या नगरसेवकांनी केली.

नवी दिल्लीः दिल्ली महापालिकेत शुक्रवारी आम आदमी पार्टी (आप) व भाजपचे नगरसेवक एकमेकांना भिडले. त्यामुळे महापौर व उप महापौर निवडी विनाच पालिकेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

दिल्ली पालिकेतील महापौर व उप महापौर निवड शुक्रवारी होणार होती. त्यात उप राज्यपाल यांनी दहा स्विकृत नगरसेवकांना शपथ देण्यास सुरुवात केली. त्यावरुन वाद सुरु झाला. आपचे नगरसेवक पुढे आले व त्यांनी नगरसेवक… नगरसेवक…, अशी घोषणा द्यायला सुरुवात केली. स्विकृत नगरसेवकांना शपथ देण्याचा आपच्या नगरसेवकांनी विरोध केला. आधी नियुक्तीत नगरसेवकांना शपथ द्या, अशी मागणी आपच्या नगरसेवकांनी केली. त्याचवेळी भाजप नगरसेवकांनी आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. या घोषणाबाजीचे रुपांतर हाणामारीत झाले, असे काही नगरसेवकांनी सांगितले.

या बैठकीच्या सुरुवातीला भाजपच्या सत्या शर्मा यांची महापौर व उप महापौर यांच्या निवडीसीठी पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर स्विकृत नगरसेवकांना शपथ देण्यासाठी बोलवण्यात आले व तेथे वादाची ठिणगी पडली. आपचे नगरसेवक थेट खुर्चीवर उभे राहिले व त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. आपच्या नगरसेवकांनी हा शपथविधी रोखला. तसेच भाजप नगरसेवकांच्या जवळ आपचे नगरसेवक गेले. त्यावेळी भाजप व आपच्या नगरसेवकांमध्ये शाब्दीक चकमक झाली. मात्र आम्ही चार स्विकृत नगरसेवकांना शपथ दिली आहे. अन्य नगरसेवकांना लवकरच शपथ दिली जाईल, असे शर्मा यांनी सांगितले.

भाजप व आपच्या नगरसेवकांमध्ये झालेल्या वादामुळे शुक्रवारी पालिकेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. कामकाजासाठी पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले. दिल्ली पालिकेत २५० नगरसेवक आहेत. सर्वाधिक संख्याबळ आपचे आहे.  भाजपचे सात लोकसभा खासदार, आपचे तीन राज्यसभा खासदार व दिल्ली विधानपरिषदेतील १४ आमदार दिल्ली महापौर व उप महापौर निवडीच्या मतदानात सहभागी होणार आहेत. स्थायी समितीच्या सहा सदस्यांची निवड करण्यात आली आहे. काॅंग्रेसने मात्र या निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली पालिकेत काॅंग्रेसचे सहा नगरसेवक आहेत.