घररायगड२० जण आले तरच लसीचा डोस मिळणार, पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाचा अजब कारभार

२० जण आले तरच लसीचा डोस मिळणार, पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाचा अजब कारभार

Subscribe

रुग्णालय प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे दुर्गम ग्रामीण भागातील जनतेला लसीचा डोस घेतल्यानंतर घरी परतण्यास उशीर होतअसल्याने त्यांचे अतोनात हाल होत आहेत. लसीचा डोस घेतल्यानंतर काही जणांना आपल्या घरी ५ ते ६ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेण्यास आलेल्या नागरिकांना तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. डोस घेणार्‍यांची संख्या २० झाली तरच डोस सुरू केले जात आहेत. त्यामुळे लसीचा डोस न घेताच परत जाण्याची वेळ येथील रुग्णालय प्रशासनाने आणली आहे. रूग्णालयाच्या या नियोजन शून्य आणि अजब कारभाराला आरोग्य विभागाने चाप लावावा, अशीअपेक्षा जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शहरापासून पोलादपूर ग्रामीण रुग्णालय एक किलोमीटरवर आहे. या रुग्णालयात कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सीन लसीचे डोस घेण्यास शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील तसेच दुर्गम अतिदुर्गम भागातील जनता येत आहे. ग्रामीण भागातून येणार्‍या जनतेस रूग्णालयात डोस घेण्यास येण्यासाठी सकाळी सात वाजता घराबाहेर पडावे लागते. एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटीची सेवा बंद असल्याने रिक्षा किंवा खाजगी चारचाकी वाहनाने जनतेला रुग्णालयात यावे लागत आहे. मात्र रुग्णालयात आल्यावर त्यांना तासनतास कोवॅक्सीन लसीच्या दुसर्‍या डोससाठी वाट पहावी लागत आहे.

- Advertisement -

रुग्णालय प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे दुर्गम ग्रामीण भागातील जनतेला लसीचा डोस घेतल्यानंतर घरी परतण्यास उशीर होतअसल्याने त्यांचे अतोनात हाल होत आहेत. लसीचा डोस घेतल्यानंतर काही जणांना आपल्या घरी ५ ते ६ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. अनेकजण आपापसात पैसे जमा करून वाहनाने जात आहेत. तर वीस जणांची संख्या संध्याकाळपर्यंत होणार नाही असे दिसून येताच लसीचा डोस न घेताच रुग्णालयातून दुपारनंतर काढता पाय घेत आहेत.

रुग्णालयाच्या या कारभाराचा फटका येथील भाजप किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष एकनाथ कासुर्डे यांनाही बसला आहे. कासुर्डे हे सोमवारी लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी रुग्णालयात पत्नीसोबत गेले होते. त्यांनी सकाळपासून दुपारपर्यंत वाट पाहिल्यानंतर तेथील वैद्यकीयअधिकारी यांना विचारणा केली. त्यावर व्यक्तीची संख्या वीस झाल्यावर लसीकरणास सुरुवात होईल असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी चार तास वाट पाहिली. पण वीस जणांची संख्या पूर्ण होण्याची शक्यता दिसून येत नसल्याने डोस न घेताच त्यांना घरी परतावे लागले. अशी वैद्यकीय सेवा मिळणार असेल तर गोरगरीब जनतेने उपचारासाठी कोठे जायचे असा प्रश्न कासुर्डे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत रूग्णालयाच्या अधिक्षक भाग्यरेखा पाटील यांच्याशी संपर्क केला असताा तो होऊ शकला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -