घररायगडरायगड जिल्ह्यात रोज दीड लाख लिटर दुधाची कमतरता

रायगड जिल्ह्यात रोज दीड लाख लिटर दुधाची कमतरता

Subscribe

मुंबईजवळ असणार्‍या रायगडमध्ये औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर कृषी क्षेत्रावर अधारित उद्योगांची घसरण होऊ लागली. त्याचा मोठा फटका येथील दुग्ध व्यवसायाला बसला. कृषी क्षेत्र कमी झाल्याने गुरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला.

एकेकाळी भाताचे कोठार अशी रायगड जिल्ह्याची ओळख होती. त्यानंतर आधुनिकीकरण वाढले. त्यामुळे औद्योगिक सह पर्यटनाचा जिल्हा म्हणून रायगड आपली ओळख टिकवून आहे. मात्र भाताचे कोठार अशी ओळख पुसट होतानाच जिल्ह्यातील शेतीपूरक व्यवसायही कमी होत गेले. शेतीला जोड म्हणून दूधदुभती जनावरे पाळली जायची. मात्र शेतीच कमी झाल्याने जनावरे देखील कमी झाली. परिणामी सध्या जिल्ह्याची दुधाची गरज जिल्ह्याबाहेरून पूर्ण करावी लागत आहे. जिल्ह्याला दीड लाख लिटर दुधाची कमतरता भासत आहे. तर जिल्ह्यातील तब्ब्ल ११४ गुग्ध संकलन संस्था कोमात गेल्याची स्थिती आहे.

रायगड जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला ग्रहण लागले आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना एकेकाळी उत्पन्नाचे साधन मिळवून देणारा दुधाचा व्यवसाय आटत चालला आहे. दुभत्या जनावरांची घटती संख्या, वाढते औद्योगिकीकरण व तरुण पिढीने व्यवसायाकडे फिरविलेली पाठ यामुळे दुग्ध व्यवसाय लोप पावत चालला आहे. परिणामी रायगडमध्ये प्रतिदिन एक लाख ४० हजार लिटर दुध बाहेरच्या जिल्ह्यातून विक्रीसाठी येत आहे.

- Advertisement -

मुंबईजवळ असणार्‍या रायगडमध्ये औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर कृषी क्षेत्रावर अधारित उद्योगांची घसरण होऊ लागली. त्याचा मोठा फटका येथील दुग्ध व्यवसायाला बसला. कृषी क्षेत्र कमी झाल्याने गुरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला. तसेच रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याने तरुण पिढीनेही या व्यवसायाकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येते. रायगड जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात दुधाची कमतरता भासत आहे. मागणी असूनही उत्पादन कमी अशा परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या व्यवसायाला पुरक वातावरण निर्माण झाले आहे. शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा या व्यवसायाकडे लक्ष दिल्यास त्यांना उत्पन्नाचे हमखास साधन मिळेल.

रायगड जिल्ह्याची लोकसंख्या २६ लाख ९० हजार आहे. जिल्ह्याला रोज ३ लाख १६ हजार २४६ लिटर दूधाची आवश्यकता भासते. जिल्ह्यात एकूण दुभती जनावरे ६३ हजार ५६७ असून, या दुभत्या जनावरांकडून १ लाख ७५ हजार ६९८ लिटर दूधाचे उत्पादन होते. तर उर्वरित १ लाख ४० हजार ५४८ लिटर दूध परजिल्ह्यातून रायगडमध्ये विक्रीसाठी येत आहे.

- Advertisement -

रायगड जिल्ह्यात १६२ नोंदणीकृत दुग्ध संस्था आहेत. त्यामधील फक्त १३ संस्था दुग्ध संकलन करीत आहेत. तब्बल ११४ संस्था बंद पडल्या आहेत. तर ३६ संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये प्रतिदिन १ हजार ९४५ लिटर दुधाचे संकलन करण्यात येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -