घरताज्या घडामोडीभारतात Covid-19 ची पहिली घरगुती mRNA लस केव्हा मिळणार?; नीति आयोगाचा महत्वाचा...

भारतात Covid-19 ची पहिली घरगुती mRNA लस केव्हा मिळणार?; नीति आयोगाचा महत्वाचा खुलासा

Subscribe

कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत सरकार सातत्याने मोठ-मोठे निर्णय घेत आहे. यादरम्यान पुण्यातून भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. माहितीनुसार, पुण्यातील जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सद्वारे भारताची पहिली घरगुती मॅसेंजर-आरएनए (mRNA) कोरोना लस विकसित केली जात आहे. नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी याबाबत आज महत्त्वाचा खुलासा केला आहे. सध्या mRNA लसीची अंतिम चाचणी सुरू आहे. त्यामुळे लवकरच ही उपयोगात येईल अशी आशा डॉ. वीके पॉल यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा देण्यासाठी आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत डॉ. वीके पॉल म्हणाले की, ‘आपण महामारी आणि व्हायरसबाबत खूप काही शिकले आहोत. परंतु जगाला या व्हायरसबाबत सर्व काही माहिती नाही. जगाला या कोरोनासोबत लढण्यासाठी एकजुट राहिले पाहिजे आणि आपल्याकडे असलेल्या उपकरणांचा उपयोग केला पाहिजे. सध्या पुण्यातील जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सद्वारे भारताची पहिली घरगुती मॅसेंजर-आरएनए (mRNA) या कोरोना लसीची चाचणी अंतिम टप्पात सुरू आहे. त्यामुळे ही लस कधीही वापरात येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

सध्या केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये ५० हजारांहून अधिक कोरोना सक्रीय रुग्ण आहेत. तसेच ११ राज्यांमध्ये १० हजार ते ५० हजारांच्या दरम्यान कोरोना सक्रीय रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: ‘या’ राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत होतेय मोठी वाढ; अजूनही सावधगिरी बाळगली पाहिजे, केंद्राचा सल्ला


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -