घररायगडजांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर गायब, दहावीच्या विद्यार्थिनीवर परिक्षा केंद्रात जाऊन केले...

जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर गायब, दहावीच्या विद्यार्थिनीवर परिक्षा केंद्रात जाऊन केले उपचार

Subscribe

दीपक पवार यांनी डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसल्याची तक्रार सुधागड तालुका आरोग्य अधिकार्‍यांना केली. त्यानंतर येथील कर्मचार्‍याने विद्यार्थिनीला औषध दिले व पेपरला उशीर होत असल्याने ही विद्यार्थीनी परीक्षा केंद्रावर गेली.

दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीला अचानक बरे वाटत नसल्याने तिला मंगळवारी (ता.१५) सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टर व इतर कर्मचारी उपस्थित नसल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

आत्मोन्नती विद्यामंदिर जांभुळपाडा या परीक्षा केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत होते. यावेळी एक दहावीची विद्यार्थिनी रडत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत विद्यार्थिनीला विचारणा केली असता, पोटात खूप दुखत असल्याचे तिने सांगितले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक युवराज सूर्यवंशी तसेच मिलिंद शिंदे, राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दीपक पवार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष हरिचंद्र पाटील, जांभुळपाडा गण अध्यक्ष नितीन परब व उपस्थितांनी तात्काळ विद्यार्थिनीला उपचारा करिता प्राथमिक आरोग्य केंद्र जांभुळपाडा येथे नेले. मात्र येथे डॉक्टर व आरोग्य सेविका का किंवा आरोग्य सेवक उपलब्ध नसल्याचे दिसून आले. यावेळी उपस्थित कर्मचार्‍यांना विचारणा केली असता डॉक्टर आल्या नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी दीपक पवार यांनी डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसल्याची तक्रार सुधागड तालुका आरोग्य अधिकार्‍यांना केली. त्यानंतर येथील कर्मचार्‍याने विद्यार्थिनीला औषध दिले व पेपरला उशीर होत असल्याने ही विद्यार्थीनी परीक्षा केंद्रावर गेली. त्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन मुलीची तपासणी केली.

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपासून या आरोग्य केंद्रातील उपचार बेभरवशाचे झाले आहेत. या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकार्‍यांची नेमणूक असताना रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष हरिचंद्र पाटील व जांभूळपाडा गण अध्यक्ष नितीन परब यांनी केला आहे.

जांभुळपाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसे कर्मचारी मिळावेत. नेमणूक ठिकाणी न राहणार्‍या आरोग्य अधिकार्‍यांची चौकशी व्हावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जांभुळपाडा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वार्‍याव सोडणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांचीही चौकशी व्हावी व त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी.
– दीपक पवार, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस

- Advertisement -

जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांच्या उपस्थितीबाबत नागरिकांच्या तक्रारीची शहानिशा केली जाईल. त्यात तथ्य आढळल्यास संबंधित आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
– डॉ. शशीकांत मढवी, तालुका आरोग्य अधिकारी, सुधागड तालुका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -