घररायगडउष्म्यामुळे काकडी, ऊस, कोकम, लिंबू दरात वाढ

उष्म्यामुळे काकडी, ऊस, कोकम, लिंबू दरात वाढ

Subscribe

उन्हाची काहिली वाढत असल्याने शरीराला थंडावा देणार्‍या कलिंगड, लिंबू, ऊस आणि काकडीला मागणी वाढत आहे. परंतु अवकाळी पावसाचा फटका याफळांच्या उत्पादनावर झाला असून दर्जाही खालावला आहे. फळांचे भाव वाढल्याने सर्वांना घाम फुटला आहे तर स्थानिक कलिंगडाचा गोडवा सुद्धा कमी झाला आहे. निसर्गाची देण असलेले कलिंगड, लिंबु सरबत, ऊसाचा रस आणि काकडी हे उष्मा घालविण्यासाठी सर्वांसाठी सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय आणि आधार आहे. परंतु जिल्ह्यासह राज्यात पडलेला अवकाळी पाऊस यामुळे कलिंगड, लिंबू आणि काकडीचे नुकसान झाले आहे.

पाली: उन्हाची काहिली वाढत असल्याने शरीराला थंडावा देणार्‍या कलिंगड, लिंबू, ऊस आणि काकडीला मागणी वाढत आहे. परंतु अवकाळी पावसाचा फटका याफळांच्या उत्पादनावर झाला असून दर्जाही खालावला आहे. फळांचे भाव वाढल्याने सर्वांना घाम फुटला आहे तर स्थानिक कलिंगडाचा गोडवा सुद्धा कमी झाला आहे. निसर्गाची देण असलेले कलिंगड, लिंबु सरबत, ऊसाचा रस आणि काकडी हे उष्मा घालविण्यासाठी सर्वांसाठी सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय आणि आधार आहे. परंतु जिल्ह्यासह राज्यात पडलेला अवकाळी पाऊस यामुळे कलिंगड, लिंबू आणि काकडीचे नुकसान झाले आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी २० ते २५ टक्यांनी भाव वाढले आहेत. अवकाळी पावसाने रायगडच्या कलिंगडाची गोडी उडाली आहे. त्यामुळे नाशिक व इतर ठिकाणावरील कलिंगड जिल्ह्यात विक्रीसाठी येत आहेत. लिंबाचीही आवक घटली आहे. त्यामुळे त्यांचेही भाव वधारले आहेत. लिंबाला तर संत्री आणि मोसंबी इतका भाव आहे. त्यामुळे लिंबू सरबत ही महागले आहे. कोकम आणि काकडीचे भावही वधारले आहे. अनेक ठिकाणी तर काकडी आणि कोकमचे दर्शनही नाही. मागील वर्षी पेक्षा यावर्षी कलिंगडामध्ये २० ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. तर एका मोठ्या काकडीमागे पाच ते १० रुपयांनी वाढ झाली आहे. उसाचे दरही शेकड्यमागे १०० रुपयांनी वाढले आहेत. परिणामी उष्म्यापासुन बचाव करण्यासाठी आता नैसर्गिक पर्याय सोडुन कृत्रिम पर्याय निवडत आहेत. त्यामध्ये बंद बाटलीतील सरबते आणि, प्लास्टिकच्या पाऊच (शॅसे) मध्ये मिळणारी सरबत यांना मागणी वाढत आहे.

- Advertisement -

वस्तूदरात वाढ
मोठा लिंबू – ७ ते ८ रुपयाला १ तर, १२ ते १४ रुपयाला २ (मागील वर्षी ५ रुपयाला १ तर १० रुपयाला २)
छोटा लिंबू – १० रूपयाला २ ( मागील वर्षी १० रुपयाला ३)
मोठा कलिंगड (२ ते ३ किलो)- ९० ते ११० रुपये (मागील वर्षी – ५० ते ७० रुपये)
काकडी मोठी – २५ रुपये (मागील वर्षी १५ ते २० रुपये)
उसाचा रस – हाफ – १५ रुपये, फुल २० रुपये (मागील वर्षी हाफ- १० व फुल १५ रुपये)
कोकम – १०० ते १२० रुपये किलो (मागील वर्षी ८० रुपये किलो)

पावसाने या वर्षी जिल्ह्यातील कलिंगडाची गोडी हरवली आहे. उत्पादन घटले असून. कलिंगडाचा आकारही प्रमाणात नाही. बहुतेक सर्व माल खराब निघत आहे. भाव मिळत नाही. त्यामुळे नुकसान होत आहे. परिणामी नाशिक येथून सुगरकेन जातीचे कलिंगड विक्रीसाठी आणत आहे.
-उमेश मढवी,
कलिंगड विक्रेता, पाली

- Advertisement -

उन्हाळ्यात लिंबाची मागणी वाढली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आवक कमी झाली आहे. घाऊक बाजारात लिंबाचे भाव वाढले आहेत. परिणामी किरकोळ बाजारात लिंबाचे भाव प्रचंड वाढले आहेत. मात्र ग्राहक कमी किंमतीत मागणी करतात हे परवडत नाही.
-कल्पेश थळे,
भाजी विक्रेता, पाली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -