घररायगडजंजिरा किल्ला पर्यटकांसाठी (Janjira Fort) खुला होणार

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी (Janjira Fort) खुला होणार

Subscribe

किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी जेट्टी, खोरा बंदर, दिघी बंदरावरुन पर्यटकांची ने-आण केली जाते. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भागातून दरवर्षी लाखों पर्यटक येतात. पर्यटकांना शिडाच्या बोटीमधुन प्रवास करताना एक वेगळाच आनंद मिळतो त्यासाठी पर्यटक शिडाच्या बोटीत बसणे अधिक पसंत करतात. पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असून व्यवसायिकांना आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे.

मुरुड-पावसामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव मुरुड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ला शासनाकडून बंद ठेवण्यात आला होता. चार महिन्यापासून जंजिरा किल्ला (Janjira Fort) बंद असल्याने पर्यटक आणि स्थानिक व्यवसायिकांनी नाराजी केली होती .पावसाळा संपत आल्याने किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी लावून धरण्यात आली होती. पुरातत्व विभागाने किल्ल्याचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुंगरे यांनी केली. १ ऑक्टोंबरपासून जंजिरा किल्ल्याचे दार उघडणार (door of the fort will open असल्याने पर्यटक व स्थानिक आनंदी झाले आहेत.

मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याचे दरवाजे बंद करण्यात आले होते.
पावसाळयात किल्ल्याच्या अवती भोवती झाडे-झुडपे वाढल्याने झुडपात सरपटणार्‍या जनावरांचा वावर वाढल्याने कोणाला धोका होऊ नये त्या कारणास्तव पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुरातत्व विभागाने किल्लाचे दरवाजे पर्यटकांनसाठी उघडले नव्हते. गेल्या अनेक दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. अशातच जंजिरा किल्ला बंद असल्यामुळे पर्यटकांनी व स्थानिक व्यवसायिकांनी नाराजी दर्शवली होती.

- Advertisement -

पर्यटकांचा ओढा वाढल्याने पुरातत्व विभागाने किल्ला खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. संपुर्ण किल्लाची साफ सफाई पुर्ण झाली असून उद्या १ ऑक्टोंबरपासून पर्यटकांसाठी किल्ला खुला केला जाणार आहे. किल्ला पाहण्यासाठी प्रति व्यक्तीला २५ रुपये तर १५ वर्षाच्या आतील मुला-मुलींना मोफत प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती सहाय्यक संवर्धक पुरातत्व विभाग अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.

पावसाळ्यात तीन महिने किल्ला बंद असल्याने बोट चालक-मालकांना त्याच प्रमाणे इतर व्यवसायिकांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागले. आता किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार असल्याने दिलासा मिळणार आहे. पकटीवरुन बोटीने जाण्यासाठी एका व्यक्तीला ८०रुपये तर लहान मुलांना ४०रुपये आकारण्यात येणार आहे.शालेय विद्यार्थ्यांना सवलत देण्यात येईल.
नाझीम कादरी
संस्थापक-जंजिरा पर्यटक सहकारी संस्था मर्या.राजपुरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -