घररायगडमाडभूवन,कोरलवाडी आदिवासी वाडीला ७५ वर्षांनंतर मिळणार रस्ता

माडभूवन,कोरलवाडी आदिवासी वाडीला ७५ वर्षांनंतर मिळणार रस्ता

Subscribe

आदिवासींच्या रस्त्यासाठी मागील पाच वर्षे सातत्याने पाठपुराव्यासह प्रसंगी संघर्ष करणार्‍या ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेसह स्थानिक जिल्हा परिषद सदस्य आणि आपटा ग्राम पंचायतीच्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे दोन्ही वाडीतील आदिवासींनी खर्‍या अर्थाने आनंदादोत्सव साजरा केला.

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांनंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या आपटा ग्राम पंचायत हद्दीतील माडभूवन आणि कोरलवाडी आदिवासी वाड्यांच्या रस्त्याचे भूमिपूजन पार पडले.रस्त्याचा नारळ फुटल्याने आदिवासी बांधवांच्या चेहर्‍यावर हास्य दिसून आले.

आदिवासींच्या रस्त्यासाठी मागील पाच वर्षे सातत्याने पाठपुराव्यासह प्रसंगी संघर्ष करणार्‍या ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेसह स्थानिक जिल्हा परिषद सदस्य आणि आपटा ग्राम पंचायतीच्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे दोन्ही वाडीतील आदिवासींनी खर्‍या अर्थाने आनंदादोत्सव साजरा केला.

- Advertisement -

यावेळी माडभुवन येथील भूमिपूजन रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य ज्ञानेश्वर घरत तर कोरलवाडी येथील रस्त्याचे भूमिपूजन ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.यातील माडभुवन रस्त्यासाठी रत्नाकर घरत यांचेही योगदान आहे.यावेळी आदिवासी बांधवांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन आभार मानले.

आपल्यासाठी रस्ता होणार असल्याने महिलांनी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांचे औक्षण केले.
यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील भानुषाली, वनपरिक्षेत्र कल्ले परिमंडळाचे वनपाल जी. पी. चव्हाण , ग्रुप ग्रामपंचायत आपटा सरपंच निकिता भोईर, ग्रामविकास अधिकारी शेंडगे, उपसरपंच ऋषभ धुमाळ, माजी सरपंच पांडुरंग भोईर, माजी सरपंच विजय मुरकुटे, दशरथ गायकर, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर आरिफ दाखवे, ज्ञानेश्वर मोरे,रत्नाकर घरत ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते सचिन गावंड, तेजस चव्हाण, अब्रार मुल्ला यांच्यासह आपटा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisement -

रायगड जिल्ह्यात आजही अशा अनेक आदिवासी वाड्या आहेत ज्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे वनविभाग आणि इतर सर्व शासकीय विभागांनी पुढे येऊन या आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे प्रयत्न करावे.
– संतोष ठाकूर, अध्यक्ष,ग्रामसंवर्धंन सामाजिक संस्था

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -