घररायगडकर्जतमध्ये किरीट सोमय्यांचे धरणे आंदोलन, वैजनाथ देवस्थान जमीन घोटाळा चौकशीची मागणी

कर्जतमध्ये किरीट सोमय्यांचे धरणे आंदोलन, वैजनाथ देवस्थान जमीन घोटाळा चौकशीची मागणी

Subscribe

जमीन आमच्या देवाची नाही कुणाच्या बापाची, वैजनाथ जमील घोटाळा चौकशी झालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. त्यानंतर तहसीलदार विक्रम देशमुख यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

कर्जत तालुक्यातील सुमारे ३०० वर्षे पेक्षा अधिक पुरातन वैजनाथ देवस्थान ची जमीन हस्तांतरित करतांना संबंधित योग्य परवानग्या न घेता अहिंदू सलीम बिलाखीया या व्यक्तीच्या नावे जमीन करण्यात आली. त्यानंतर लगेचच अल्पावधीत एका बड्या राजकीय व्यक्तीच्या परिवारातील सदस्याने ही जमीन विकत घेतली. त्यामुळे या व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करत सोमय्या यांनी धरणे आंदोलन केले.

कर्जत डी मार्टसमोर (किरवली) या ठिकाणी किरीट सोमय्या आणि भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने करत धरणे आंदोलन केले. जमीन आमच्या देवाची नाही कुणाच्या बापाची, वैजनाथ जमील घोटाळा चौकशी झालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. त्यानंतर तहसीलदार विक्रम देशमुख यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

यावेळी भाजपा कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, किसान मोर्चा कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, कर्जत तालुका सरचिटणीस संजय कराळे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद पाटील, कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, बिनिता घुमरे, गायत्री परांजपे, संदेश कराळे, मिनेश मसणे, केशव तरे, मयूर शितोळे, विजय कुलकर्णी ,प्रभाकर पवार, अंकुश मुने आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तहसीलदार विक्रम देशमुख यांनी वरिष्ठ अधिकार्‍याच्या पातळीवर चौकशी करण्यात येईल असे सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -