घररायगडवायुगळतीच्या अफवेने महाडकर पुन्हा रस्त्यावर

वायुगळतीच्या अफवेने महाडकर पुन्हा रस्त्यावर

Subscribe

नागरिकांनी घाबरुन जावू नये व आपाआपल्या घरी परतावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे .

लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनी, महाड येथे वायूगळती होऊन मोठा स्फोट होण्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे नागरिक भयभीत होऊन मोठया प्रमाणात रस्त्यावर आले आहेत. तथापि लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनी, महाड या ठिकाणी तज्ञ उपस्थित असून कोणताही धोका नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये व राहते घर सोडू नये. बरेच नागरिक वाहने घेऊन मुंबई गोवा महामार्गावर आल्याने बिरवाडी येथे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. तरी महाड येथे पाठविण्यात येत असलेली अन्न-पाण्याची मदत पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला आहे. मात्र नागरिकांनी घाबरुन जावू नये व आपाआपल्या घरी परतावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे .

हिरकणीवाडीत दरड कोसळली, घरांना तडे

ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली हिरकणी वाडी गेल्या तीन दिवसांपासून सतत कोसळणार्या पावसामुळे धोकादायक स्थितीत असून, शनिवारी तेथे दरड कोसळण्याची घटना घडली आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यात घरांच्या खालील माती खिळखिळी झाल्याने धोका वाढला आहे. मात्र यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

महाडमध्ये अनेक संसार उघड्यावर

गेले तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांनी कधी नव्हे इतके रौद्ररूप धारण केले होते. असे शहरात आलेले पाणी उभ्या हयातीत पाहिले नसल्याची प्रतिक्रिया अनेक बुजुर्गांनी व्यक्त केली. पाण्याची पातळी जवळपास २० फुटांपर्यंत पोहचली आणि सुरक्षित समजल्या जाणार्या इमारतीचाही पार्किंग परिसर सोडून पहिल्या मजल्यावर पुराचे पाणी गेल्याने हजारो संसार डोळ्यासमोर उघड्यावर आले. घरातील अन्नधान्य, कपडे, फर्निचर पुराच्या पाण्यातून आलेल्या चिखलाने नष्ट झाले. बैठ्या घरांतून तर होत्याचे नव्हते झाले आहे.


हेही वाचा – ICSE, ISC Result 2021: यंदा ICSE दहावीचे ९९.९८ विद्यार्थी उत्तीर्ण, तर ISC बारावीत ९९.७६ विद्यार्थी उत्तीर्ण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -