Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी JEE (Main)-2021 Session 3 : महाराष्ट्रात पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक...

JEE (Main)-2021 Session 3 : महाराष्ट्रात पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी

Related Story

- Advertisement -

पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना JEE MAIN परीक्षा देण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पावसाच्या कारणामुळे २५ जुलै आणि २७ जुलै या कालावधीत परीक्षा देता येणार नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आणखी संधी देण्यात येणार आहे. त्यांच्यासाठीची परीक्षेची तारीख पुन्हा जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पावसामुळे राज्यात कोल्हापूर, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा यासारख्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अतिशय गंभीर परिस्थिती आहे. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यासाठीची माहिती ही एनटीएला दिली असल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

त्यामुळेच पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी JEE (Main)-2021 Session 3 परीक्षेची तारीख लकरच जाहीर करण्यात येईल अशीही घोषणा धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. या परीक्षेसाठी २५ जुलै आणि २७ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार होते. या परीक्षेसाठी २० आणि २२ जुलैच्या परीक्षा याआधीच पार पडल्या आहेत.

- Advertisement -

NTA JEE 2021


 

- Advertisement -