घररायगडरेती माफियाकडून नैसर्गिक बेट होणार नष्ट

रेती माफियाकडून नैसर्गिक बेट होणार नष्ट

Subscribe

सेक्शन पंपाच्या वापरामुळे नैसर्गिक कांदळवनांना धोका

 

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

दीपक घरत: पनवेल
सेक्शन पंपा द्वारे अवैध रित्या करण्यात येत असलेल्या रेती उपशा मुळे खाडी पत्रात असलेली नैसर्गिक बेटे उध्वस्त केली जात असून, कांदळवनांना देखील धोका पोहचत असल्याचे चित्र उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रावरून स्पष्ट होत आहे. सेक्शन पंपाच्या वापरामुळे खाडी पात्रातील जैवविविधतेचि होत असलेली हानी रोखण्यासाठी सर्वच सरकारी यंत्रणांनी एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत निसर्ग प्रेमिकडून व्यक्त करण्यात येत आहे. पनवेल परिसराला लाभलेल्या विस्तीर्ण खाडी किनार्‍यामुळे पूर्वी मोठ्या प्रमाणात करण्यात येणारा मासेमारीचा व्यवसाय जलप्रदूषणामुळे जवळपास संपुष्ठात आला आहे.सरकारने रेती उपशावर घातलेल्या बंदीमुळे स्थानिकांकडून पारंपारिक पद्धतीने करण्यात येणारा रेती व्यवसाय देखील ठप्प झाला आहे.परिणामी सेक्शन पंपाद्वारे अवैधरित्या रेती उपसा करणार्‍यांचे फावले असून, खाडी पात्रात असलेल्या नैसर्गिक बेटांच्या आडून मोठ्या प्रमाणात रेती उपसा केला जात आहे.सेक्शन पंपाचा वापर करून बेटा भोवती असणारे खडक फोडले जात असल्याने नैसर्गिक बेटे नष्ट होत आहेत. तसेच बेटांवरील कांदळवनांना देखील धोका पोहचत असल्याने कांदळ वनांचे संरक्षण करण्यासाठी नेमण्यात आलेले कांदळवण कक्ष, तहसील विभाग, पोलीस आणि निसर्गाची हाणी रोखण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सामाजिक संस्थांनी एकत्रितरित्या प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत निसर्ग मित्र संस्थेचे निलेश शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

कारवाईसाठी तहसील विभागाकडे अपुर्‍या सुविधा
रेतीमाफियांवर कारवाई करण्याची जवाबदारी असलेल्या तहसील विभागाकडे कारवाईसाठी अपुर्‍या सुविधा आहेत. एखाद्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी जायचे असल्यास या विभागाच्या अधिकार्‍यांकडे स्वतःची बोट तसेच आपत्कालीन स्थितीत लागणारे लाईफ जॅकेट उपलब्ध नाहीत. या मुळे अधिकार्‍यांना कायम खाजगी बोट चालकांची मदत घ्यावी लागते तसेच कारवाई करायला जाणार्‍या अधिकार्‍यांवर अनेकदा रेती माफिया हल्ले करत असल्याच्या घटना घडत असताना देखील अधिकार्‍यांना संरक्षण देण्यास स्थानिक पोलीस प्रशासन देखील टाळाटाळ करत असल्याची खंत तहसील विभागाच्या एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

मानवी वस्तीसधोका पोहचण्याची शक्यता
खाडी पात्रात असणारी नैसर्गिक बेट नष्ट झाल्यास भरतीच्या वेळी प्रवाही पुराचा वेग तीव्र होऊन, मानवी वस्तीत पाण्याचा शिरकाव होण्याची शक्यता जास्त आहे. प्रवाहाला नैसर्गिक अडथळे ठरत असलेले बेट काढल्याने खाडी पात्रातील भरतीचे पाणी वाहत राहील आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल.या मुळे सरासरी समुद्र सपाटीपासून खाली असलेल्या कळंबोली सारख्या वसाहतीत भरतीचे जास्त पाणी शिरायला वाव मिळून वसाहतीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

संकेत स्थळावर माहिती उपलब्ध
उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रातून रेती माफिया कशा प्रकारे नैसर्गिक बेटांना हानी पोहचवत आहेत हे पाहायला मिळते. संकेत स्थळावर सहजपणे उपलब्ध असणार्‍या छायाचित्रातून ही माहिती उघड झाली आहे. मात्र असे असतानाही हे प्रकार रोखण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे दिसून येते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -